नगरला आरटिओ विनोद सगरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा अ.नगर लक्झरी बस असो. तर्फे स्वागत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अ.नगर लक्झरी बस असोसिएशन तर्फे स्वागत करण्यात आले. नगरच्या परिवहन कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात हे स्वागत करण्यात आले मोठ्या संख्येने असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते .संघटनेचे अध्यक्ष हनुमंत दारकुंडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,व पुष्पगुछ देऊन त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी असो.चे ईश्वर धोका,उपाध्यक्ष प्रमोद बेदमुथा, सेक्रेटरी रियाजभाई मुलाणी, श्रीधर दारुणकर, गणेश उपाध्ये, बाळासाहेब उबाळे, गणेश गायकवाड, बाबासाहेब गेरंगे, संपत कराळे, जनार्धन मल्लेश, नवनाथ गव्हाणे, अमित साळवे, अमोल भांड, सुनील तांबे, सचिन वांडेकर, जिशान शेख, योगेश बोरुडे बाबासाहेब शेकडे, आयुब शेख व इतर बस मालक उपस्थित होते.
श्री. दारकुंडे यांनी नवीन नियुक्त झालेले प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्याशी लक्झरी बसेस, स्कूल बसेस व प्रवास वाहनांच्या बाबतीत येत असलेल्या अडी-अडचणी मांडल्या. भविष्यात योग्य ते सहकार्य करण्याची विनंती लक्झरी बस असोसिएशन व सर्व बस मालकांच्या वतीने केली त्यास प्रतिसाद देत आपले योग्य असे प्रश्न सहकार्याच्या भावनेतून सोडविण्याचा निश्चितच माझा प्रयत्न राहील असे अश्वासन यावेळी श्री सगरे यांनी शिष्टमंडळास दिले. दारकुंडे पुढे बोलताना म्हणाले या अगोदरच्या प्र. प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात लक्झरी बसेस व स्कूल बसेस व इतर प्रवासी वाहनांना मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले बद्धल त्यांचेही बस संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. सध्या वाहनांचे टॅक्स, फिटनेस व परवाना या सर्व गोष्टी ऑनलाइन असल्याने सुरुवातीच्या काळात अडचणी येत होत्या परंतु त्या सदरच्या अडचणी तातडीने सोडविल्या जात असल्याबद्धल समाधान व्यक्त केले. उपाध्यक्ष प्रमोद वेदमुथा यांनी आभार मानले.