संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
अहमदनगर व नाशिक जिल्हयातील महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून दुचाकीवर पळून जाणारी सराईत गुन्हेगारांची टोळीतील दोन चोरटे पकडले असून, चोरट्यांकडून साडेपंधरा तोळ्याचे एकूण ७ लाख ६५ हजार रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपी विशाल बालाजी भोसले (वय २९ , रा. अशोकनगर श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर) व संदिप दादाहरी काळे (वय ३२ व, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकाॅ विजय वेठेकर, भाऊसाहेब काळे, विश्वास बेरड, संदीप पवार, भाऊसाहेब कुरुंद, पोना शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, पोकाॅ सागर ससाणे, रोहित यमुल, आकाश काळे, योगेश सातपुते, चापोहेकाॅ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे करणा-या गुन्हेेगारांची माहिती काढून कारवाई करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत जिल्हा पोलीस मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोनि अनिल कटके यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले.
दरम्यान पोनि श्री कटके यांना विशाल बालाजी भोसले (रा. अशोकनगर, ता श्रीरामपूर जि. अहमदनगर) हा त्याचे साथीदारांनी चैन स्नॅचिंग करून चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीनुसार पोनि श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खाञी करून कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने श्रीरामपूर येथे सापळा लावून गांधी चौकात विशाल बालाजी भोसले (वय २९, रा.अशोकनगर श्रीरामपूर, ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर) हा सापडला. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एका लाल रंगाचे कापडी पिशवीत सोन्याचे दागिने व दोन सोन्याच्या लगड मिळून आले. त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने संदीप दादाहरी काळे (वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर), लहू बबलू काळे (रा.पळसे कारखाना, ता.जि.नाशिक) व योगेश सिताराम पाटेकर (रा.वडाळा महादेव ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर) यांनी मिळून अहमदनगर शहर, संगमनेर व नाशिक येथून दुचाकीवरुन येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरून आणले आहे, व ती दागिणे मोडीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.
या आरोपींच्या माहितीनुसार अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील गुन्हे अभिलेख तपासले असता,७ गुन्हे निष्पन्न झाली.
गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालातील ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व दोन सोन्याच्या लगड त्याचे कब्जात मिळुन आल्याने त्यास जागीच ताब्यात घेण्यात आले. गुन्हे करणारे त्याचे साथीदार यांचा शोध घेता संदिप दादाहरी काळे (वय ३२, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याचा वडाळा महादेव परिसरात जाऊन पथकातील अंमलदार यांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले आहे.
आरोपी विशाल बालाजी भोसले (वय २९ , रा. अशोकनगर श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर) व संदिप दादाहरी काळे (वय ३२ व, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) दोन्ही आरोपींना अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हे हे त्यांचे साथीदार लहु बबलु काळे (फरार, रा. पळसे कारखाना, ता. जि. नाशिक) व योगेश सिताराम पाटेकर (फरार, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) याचे सोबत मिळून केले असल्याचे सांगितले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी फरार आरोपींचा शोध घेतला परंत ते मिळुन आले नाही.
आरोपी विरुध्द यापूर्वी विविध पोलीस ठाणेस दरोडा, जबरी चोरी, चोरी, दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.