ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
Mumbai – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येत रोज्याला संबोधीत केलं. आपण संयम, धैर्य आणि जिद्दीने कोरोनाविरुद्ध लढत आहोत. शत्रू दिसला असता तर एक घाव दोन तुकडे केले असते. याशिवाय राज्यात टेस्ट करा टेस्ट करा अशा मागण्या होत आहेत. राज्यात कोरोनाच्या ६६ हजार ७९६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ९५ टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. गंभीर असलेल्या रुग्णांच्या सर्वात जास्त चाचण्या करण्यावर भर आहे. राज्यात ३ हजार ६६ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. नागरिकांनी लक्षणं दिसली तर रुग्णालयात जाऊन चाचणी करुन घ्या. कोळतीही लक्षणं लपवू नका. कोरोना झाला म्हणजे सर्व संपलं असं नाही. मास्क आणि सोशल डिस्टंसिंगने आपण कोरोनाला दुर ठेवू. धीर सोडू नका. हे संकट टळेल. आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पीपीई किटचा तुटवडा आहे पण आम्ही पुरवठा करतोय. ८० ते ९० टक्के लोकांपर्यंत रेशन पोहोचवलं आहे. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन वाढवलं हे चांगलं काम केलं आहे. देशातली आकडेवारी कमी होत आहे, पण भ्रमात राहून चालणार नाही. अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून काही सवलती देत आहोत. त्यासाठी रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. ग्रीन आणि ऑरेन्ज झोनमधील उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात येणार आहे. मजुरांची काळजी घेत असाल तर सरकार मदत करेल. जिल्हाबंदी कायम असणार आहे. मात्र, मालवाहतुकीला परवानगी असेल.