संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखाना परिसरातील धनगर वाडीत बाबिरदेव यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला.
गंगेच्या पाण्याने जलाभिषेक, ढोलाच्या आणि डफाच्या तालावर नृत्य काम,धनगरी ओव्या,वाणवह्या, येलुबाई आणि मावलाई देवीची सुवासिनी महिलांच्या हस्ते खणा नारळाने ओटीभरून वाजत गाजत महाप्रसाद अर्पण करण्यात आला, मुख्य भक्त बाबासाहेब गवते यांनी पारंपारिक होईक सांगितले.
ते पुढील प्रमाणे-पुढचे पाउल पुढेच राहील. मागे हटणार नाही. जेथें धार्मिक कार्यक्रम होतील तेथे सुबत्ता राहील. होळीच्या सणाला फड शिंपण्यासाठी पाउस येईल.कांदा रडवेल,गहु हरबरे जोडीने पिकतील सवाईने विकतील,पुढील वर्षी कल्याणी क्रुतिका नक्षत्रात पाण्यासाठी चिमण्या चिवचिव करतील,जेथे जेथे हरिनामाचा गजर होईल तेथे तेथे पाउस पडेल,रोहिणी नक्षत्राचे चळण सर्वत्र फिरेल,म्रुग नक्षत्रात काही ठिकाणीच पेरणी होईल,राहिलेल्या ठिकाणी आर्द्र नक्षत्रात पाउस पडेल. जठुड साधेल आणि माळरानावर गाई चरतील अशी परिस्थिती निर्माण होईल अशाप्रकारे होईकात भविष्य वाणीतून आख्यायिका सांगितली. यात्रा महोत्सव कार्यक्रमा साठी मच्छिंद्र आडभाई,चांगदेव गायके,केशव ओहळ,पंढरिनाथ डफाळ,रावसाहेब तांबे,डिग्रस येथील बिरोबा भक्त एकनाथ खाटेकर, सुरेश बेल्हेकर, नानासाहेब बेल्हेकर, बन्सी मोहिते, विलास मोहिते, मीरीचे बिरोबा भक्त सिताराम भगत,देवीची सेविका भाग्यश्री आडभाई यांनी विषेश परिश्रम घेतले. महाप्रसादाने या महोत्सवातची सांगता झाली.
संकलन: सुनिल नजन