संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पुणेः महाराष्ट्रातील पुण्याच्या फुरसुंगी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्यामुळे त्यानं अॅडमिनची जीभ कापली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीने जखमी पतीला रुग्णालयात नेले, जेथे त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर जखमी तरुणाच्या पत्नीने आरोपीविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे संपूर्ण प्रकरण पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यातून उघडकीस आले आहे, जिथे ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगी येथे ओम हाईट्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग नावाची सोसायटी आहे. तक्रारदार प्रीती हरपळे या सोसायटीच्या अध्यक्षा आहेत. आरोपी आणि तक्रारदार हे एकाच सोसायटीतील रहिवासी आहेत. दरम्यान, सुरेश पोकळे यांना सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर वाद झाला, ज्यामध्ये प्रीती हरपळे यांचे पती किरण हरपळे यांना 5 जणांनी मारहाण केली.
तसेच मला ग्रुपमधून का काढून टाकलं, याचा जाबही पोकले याने हरपळेंना विचारला. ग्रुपवर कोणीही मेसेज टाक असल्यामुळे ग्रुपच बंद केल्याचे हरपळे यांनी सांगितलं. त्यानंतर पोकळे यांनी हरपळे यांना शिवीगाळ करत तोंडावर बुक्का मारला.
एवढेच नाही तर ग्रुप भ्य ॲडमिनला बेदम मारहाण केल्यानंतर या टोळीने ॲडमिनची जीभही कापली. जखमी व्यक्तीच्या जिभेला टाके पडले असून तो गंभीर जखमी आहे. यानंतर सोसायटीचे अध्यक्ष आणि पीडितेच्या पत्नीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 डिसेंबरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश किसन पाईकले, सुएग भरत शिंदे, अनिल म्हस्के, शिवराम पाटील, किसन पवार अशी आरोपींची नावे आहेत.