संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : दोन सराईत चोरट्यांना पकडून त्याच्याकडून दोन सायकली हस्तगत करण्याची कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. अभिषेक शाम शिंदे (रा नव नागापूर), शैलेश संजय पवार (रा. वरवांडी ता. राहुरी) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर शहर डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप, पोहेकॉ नंदकिशोर सांगळे ,पोना पांढरकर, पोकाॅ सुरेश सानप, पोकाॅ नवनाथ दहिफळे आदिंच्या टिमने केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग सुरू असताना पोहेकॉ नंदकिशोर सांगळे, पोकाॅ सुरेश सानप, पोकाॅ नवनाथ दहिफळे यांना माहिती मिळाल्यावरून अभिषेक शाम शिंदे (रा नव नागापूर) व शैलेश संजय पवार (रा. वरवांडी ता. राहुरी) हे अडवाणी चौक एमआयडीसी येथे संशयीतरित्या चोरीच्या सायकली घेऊन फिरताना मिळून आले. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील ६ हजार रुपये किमतीचा दोन चोरीच्या सायकल हस्तगत केल्या आहेत. आरोपींनी इतर साथीदारांसोबत आणखी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपींवर मुंबई पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.