श्री क्षेत्र त्रम्बकेश्वर येथील पालखीचे आमदार संग्राम जगताप यांनी दर्शन घेतले
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- श्री क्षेत्र त्रम्बकेश्वर येथील पालखीचे आमदार संग्राम जगताप यांनी दर्शन घेतले तसेच पालखी ज्या ठिकाणी थाबलेली आहे त्या ठिकाणी जिल्हा हमाल पंचायत च्या वतीने महाप्रसादचे वाटप आमदार संग्राम जगताप यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्ध्यक्ष अविनाश घुले, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, बबन आजबे, नारायण गीते, सतीश शेळके, बहिरू कोतकर, रामा पाणसम्बल, रवींद्र भोसले, तबाजी कार्ले आदीसह हमाल मापाडी – कामगार उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मागील दोन वर्षाच्या कालखंडानंतर पालखीचे आपल्या नगरमध्ये आगमन झाल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. या ठिकाणी नुकतेच परिसरात नुकतेच रस्त्याचे काम मार्गी लागल्याने हा परिसर वारकरी यांनी फुलून गेला आहे. हमाल पंचायत मागील अनेक वर्षांपासून या दिंडीचे मोठ्या उत्सहात स्वागत करते. याबद्दल यांनी हमाल पंचायतचे सर्वाचे कौतुक केले .
जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितले कि या ठिकाणी आम्ही वारकरी यांची घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेऊन त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवत असतो. त्यांची या ठिकाणी आरोग्य तपासणी सुद्धा केली जात असल्यांचे घुले यांनी सांगितले.