संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः दुचाकी गाड्यांची चोरी करुन त्याच्या स्पेअरपार्टची विल्हेवाट लावणा-या चोरट्यांना कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले असून, चोरट्यांकडून चोरीच्या 7 दुचाकी व स्पेअरपार्ट हस्तगत करण्यात आल्या आहेत. एकूण 2 लाख 50 हजार रु किं.चा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे. रोहीत आप्पासाहेब शिरोले (वय21, रा सोरभनगर पंडीत हॉस्पिटल, भिंगार अ.नगर), यश प्रकाश ओहळ (वय21, रा यशवंतनगर डेअरी फार्म भिंगार, अ.नगर), करण कैलास पवार (वय23, रा.विजय लाईन तुळजा भवानी मंदीरा जवळ आलमगीर रोड भिंगार, अ.नगर), इम्रान सलिम शेख (वय21, रा शाहकॉर्नर आलमगीर भिंगार, अ.नगर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोसई महेश शिंदे, पोसई प्रविण पाटील, पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, पोहेकाँ विशाल दळवी, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोहेकाँ विक्रम वाघमारे, पोहेकाँ सुर्यकांत डाके, पोहेकाँ सलीम शेख, पोहेकाँ राहुल शिंदे, सतीश भांड, पोकाँ अभय कदम, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ सतिश शिंदे, पोकाँ अनुप झाडबुके, पोकाँ राहुल गुंडु आदिंच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कोतवाली पोलिस ठाण्यात दुचाकी चोरी गुन्ह्याचा तपास करत असतांना पोनि श्री.दराडे यांना माहिती मिळाली की, गुन्हयातील दुचाकी चोरी करणारे आरोपी हे सर्राईत दुचाकी चोर असून ते शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करत असतात. त्या एक दुचाकी गाडी गॅरेजवाल्याच्या मदतीने त्याचे स्पेअरपार्टची खोलून विक्री केली जाते, अशी माहिती मिळाल्याने त्या आरोपींचा शोध घेतला असता एक संशयीत एका स्पलेंडर दुचाकीला त्याच्या कडील डुप्लीकेट चावी लावण्याचा प्रयत्न करत असताना त्यास ताब्यात घेतले. चौकशी केली असता मी दुचाकी गाडी चोरुन घेऊन जाणार होता. माझ्यासोबत आणखी दोघे आहेत, ते देखील माळीवाडा येथे गाड्या शोधत आहेत. आम्ही चोरी केलेल्या गाड्या या भिंगारमध्ये एका दुचाकी फिटरकडून विक्री करुन त्याचे स्पेअरपार्टची विक्री करतो, अशी माहिती दिल्याने त्या तिघांचा शोध घेऊन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे नाव विचारता त्यांनी नावे सांगितली. त्यांच्या घर व गॅरेडची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेल्या 5 दुचाकी, 2 खोललेल्या गाडीचे स्पेअरपार्ट असे एकूण 2 लाख 50 हजार रु किं.चा मुद्देमाल मिळून आला आहे. या वाहनांपैकी कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं 818/2024, भिंगार पोलिस ठाण्यात गुरनं 652/2024, सरदारपुर, ठाणे, जिल्हा धार मध्यप्रदेश येथील चोरी केलेली आहे.