दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील‌ ५ जणांना पकडले ; राहुरी पोलिसांची कारवाई

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील‌ ५ जणांना पकडले ; राहुरी पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहुरी : दरोड्याच्या तयारीत असलेल्या ७ सशस्त्र असणाऱ्यांचा पाठलाग करण्याची मोहीम राहुरी पोलिसांनी राबवली. या मोहिमेत दरोड्यासाठी वापरलेल्या वाहन,  हत्यारांसह ५ जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
सुखदेव रामदास खिलदकर (वय ३०, रा. नांदूर, ता. आष्टी जि. बीड), साहिल सिकंदर सय्यद (वय२५, रा. नांदूर, ता. आष्टी, जि. बीड), अरुण बाळासाहेब बर्डे (वय २२, रा. कुरणवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर), सोमनाथ रामदास गायकवाड (वय २७, रा. कुरणवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर), शक्तिमान रामदास गायकवाड (रा. कुरणवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, पोलिस अधीक्षक वैभव कुलुबर्मे, श्रीरामपूर डिवायएसपी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस ठाण्याचे पोनि संजय आर.ठेंगे यांच्या सूचनेनुसार सपोनी देवेंद्र शिंदे, सपोनी रविंद्र पिंगळे , पोउपनि धर्मराज पाटील, चापोह शाकुर सय्यद , पोना प्रवीण अहिरे , पोह सुरज गायकवाड, राहुल यादव , प्रवीण बागुल, विकास साळवे, सतीश आवारे, बाबासाहेब शेळके,पोकॉ प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजणे, आदिनाथ पाखरे, नदीम शेख, गोवर्धन कदम, रोहित पालवे,गणेश लिपणे, अमोल भांड पोना मोबाईल सेल श्रीरामपूर’ चे पोना सचिन धनाड, पोना संतोष दरेकर यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी पोलीसांच्या रात्रगस्त करणाऱ्या टिमला माहिती मिळाली की, गुहा परिसरामध्ये काही संशयीत लोक टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची मालवाहतूक गाडी व दुचाकीने येऊन दरोड्याच्या तयारीने टेहळणी करत आहे. माहितीच्या अनुषंगाने राहुरी पोलीसांचे रात्रगस्त अधिकारी, कर्मचारी यांनी व गुन्हे शोध टिमशी समन्वय साधून माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. या दरम्यान संबंधित ठिकाणी एकूण ७ संशयीतांपैकी दुचाकीवरील तिघे दुचाकीवर पळून गेले. जागेवर सुखदेव रामदास खिलदकर, साहिल सिकंदर सय्यद, अरुण बाळासाहेब बर्डे, सोमनाथ रामदास गायकवाड ही चौघे सापडले. चौघांना ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे धारदार शस्त्र, दोऱ्या, स्क्रू ड्रायव्हर, वेगवेगळे पान्हे, केबल कटर, लोखंडी कत्ती, लाइटर असे साहित्य मिळून आले. छाप्यातील एका टीमने दुचाकीवर पळून गेलेल्यांचा पाठलाग केला. दुचाकीस्वार याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते तिघेही तिथे पडले असता पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकास मार लागलेला असल्याने तो पळून जाऊ शकला नाही. त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव शक्तिमान रामदास गायकवाड (रा. कुरणवाडी, ता. राहुरी जि. अहमदनगर) असल्याचे सांगून इतर दोन पळून गेलेल्यांची नावे बाळू लहानू गायकवाड व नवनाथ तुकाराम पवार असल्याचे सांगितले.
सातही आरोपींना विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४)(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात एकूण पाचजणांना अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयासमोर पोलीस कस्टडी रिमांड कामी मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे. पुढील तपास सपोनि रविंद्र पिंगळे हे करत आहेत.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!