संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- दरोडा गुन्ह्यामधील आरोपी २४ तासाच्या पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी कोतवाली पोलीसांनी केली आहे. आरोपी ऋषीकेश प्रदीप लड्डे (रा. सिव्हील हाडको सावेडी अहमदनगर), अक्षय ऊमाकांत थोरवे (रा. सागर हॉटेल शेजारी पाईपलाईन रोड अहमदनगर), यश किरण पवार (रा. सिव्हील हाडको सावेडी अहमदनगर ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे असून या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्याना शुक्रवार(दि.१४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके, कोतवालीचे पोनि संपतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार पोसई सुखदेव दुर्गे, पोसई सोपान गोरे, चापोहेकाँ तागड, पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना योगेश कवाष्टे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोकाॅ अभय कदम, पोकाॅ दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ सोमनाथ राउत, पोकाॅ अतुल काजळे, पोकाॅ प्रशांत बोरुडे व मोबाईल सेलचे पोकाँ नितीन शिंदे, पोकाँ राठोड व स्थागुशाचे सफौ राजु वाघ,संजय खंडागळे, पोहेकाँ बापू फालाणे, पोना भिमराज खरसे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि १० जानेवारी २०२२ रोजी मोपेड गाडीवरुन पहाटे जात असताना जुने कोर्टजवळ त्यांचे पाठीमागून तीन अनोळखी आरोपी हे एका विना नंबरच्या गडद लाल रंगाची मोपेड गाडीवरुन येऊश त्यांनी गाडीवरुन खालीपाडून धारधार हत्याराने दोन्ही हाताचे पंजावर मारुन गंभीर जखमी करुन त्यांचे गळ्यातील अंदाजे १० तोळे वजनाची सोन्याची चैनगोफ बळजबरीने तोडून चोरून नेली, या सतिष उर्फ बाळासाहेब नारायण तरीटे (रा चितळे रोड अहमदनगर) यांनी दवाखान्यातील दिलेल्या जबाबा वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं । २५ / २०२२ भादवि कलम ३९४,३९७,३४ प्रमाणे गुन्हा रजि, दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना पो नि संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. गुन्ह्यातील आरोपी हे आयुर्वेद चौक येथे गुन्हयात वापरलेले मोपेड़ गाडी सह येणार आहेत अशी बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने आयुर्वेद चौक येथे सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले.