👉शाहे फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंचाचा पुढाकारातून उपक्रम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – थॅलेसिमीयाग्रस्त ‘राजश्री’ या चिमुरड्यासाठी लागणा-या रक्तासाठी वाढदिवसाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर घेण्यात आले. हा जीवनदायी उपक्रम भिंगार येथील सैनिक नगर येथे शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंचाच्या पुढाकाराने घेतला. या दरम्यान उपस्थित रक्तदात्यांनी रक्तदान करून चिमुकल्या राजश्रीला दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रक्तदान शिबीर हे थॅलेसिमीयाग्रस्त असणा-या कु.राजश्री रवीकुमार सकट या चिमुरड्या ९ वर्षाच्या मुलीला लागणा-या रक्तासाठी तिचा वाढदिवशी रक्तदान शिबिरातून साजरा झाला. राजश्री हिला महिन्यातून किमान दोन वेळेस रक्ताची गरज असते. हे जीवनदायी शिबिर हे आमदार संग्राम जगताप यांच्या विचारमंथनातून घेतलं. या महत्त्वपूर्ण शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते सर यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, शाहु फुले आंबेडकर साठे कलाम विचारमंचाचे संस्थापक अशोक शिंदे, कॉग्रेस प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, मंचाचे प्रदेशाध्यक्ष गणेश ढोबळे, सरपंच विष्णु घनवट, केतकी ग्रा.पं.चे उपसरपंच प्रकाश घोरपडे, भाजपा.अनु. जा. मोर्चाचे सचीव सुनिल सकट आदिंसह नागरिक उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण शिबिरात अनेक सुज्ञ जागरुक नागरिकांनी रक्तदानात सहभाग घेऊन रक्तदान केले.
जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांनी या शिबीरात सहभागी होऊन रक्त संकलन करीत सहकार्य केले. यामुळे “शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंचाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेश ढोबळे, प्रदेशकार्याध्यक्ष सुनिल सकट, धिरज ढोबळे, रविकुमार सकट, सुरज ढोबळे, महेश कांबळे आदिंनी रक्तपेढीचे आभार मानले.