संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुलेंना पक्षाच्या काही फुटीरवादी संचालकामुळे पराभव पत्करावा लागला. परंतु हा पराजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलंच जिव्हारी लागला आहे. यामुळे या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांची साथ सोडणा-या त्या अपवाद संचालकांना पक्षातून निलंबित करा. तसेच पराभवास जबाबदार असल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा पक्षश्रेष्ठींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी अहमदनगर येथे शुक्रवारी (दि.१०) आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव कोलते, अशोक मिसाळ, दादासाहेब गंडाळ आदी उपस्थित होते.
दरम्यान श्री पाटील व श्री कोळगे म्हणाले की, जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी काॅग्रेसचे बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या उपस्थितीत अहमदनगर विश्रामगृहात बैठक घेऊन सर्व संचालकांची मते जाणून घेतली होती. यात एखाद्याचा उमेदवाराच्या नावाला विरोध असेल अथवा इच्छुक असलेल्यांच्या भावना नेत्यांनी जाणून घेतल्या होत्या. यानंतर दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी जिल्हा बँक निवडणुकीबाबत संचालकांशी चर्चा केली. यानंतर कोणीही संचालक काहीही बोलले नाहीत. परंतु प्रत्यक्षात जिल्हा बँक निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. यात पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना पराभव पत्करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीने म्हणजेच सर्वच आघाड्यांनी आमची भूमिका स्पष्ट केली आहे.
पक्षश्रेष्ठी शरद पवार, पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जिल्हा बँक निवडणुकीत फुटीरवादी संचालकांवर निलंबनाची कारवाई करुन त्यांची पक्षातून हाकलपट्टी करावी. त्याबरोबर अहमदनगर जिल्ह्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची जिल्हाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी होती. पण ते निवडणूक काळात ते फिरकले नाहीत. म्हणूनच त्यांची भूमिका संशयास्पद वाटते. जिल्हाध्यक्ष फाळके हे सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहेत. यामुळे पक्षश्रेष्ठींनी राजेंद्र फाळके यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी अहमदनगर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षश्रेष्ठींकडे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्यासह आम्ही सर्व पदाधिकारी करत असल्याची माहिती अहमदनगर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री कोळगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.