संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – आम्हाला नाही कुणाची भिती अश्या तो-यात अहमदनगर शहरातील नेहमीच वर्दळीच्या पाईपलाईन मार्गावर पाच बिंगो व एक क्लब जुगार अवैधधंदे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने जोरात सुरू आहेत. या बिंगो व क्लब अवैध धंद्यांवर आयजी पथकाकडून कारवाई होईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने पाईपलाईन मार्गावर वाणीनगर कमानीजवळ एक क्लब तर भाजीमार्केट जवळील चार ठिकाणी आणि एकविरा चौकात एक बिंगो असे एकूण पाच ठिकाणी जुगार धंदे जोरात सुरू आहेत. वाणीनगर कमानीजवळील क्लब च्या माध्यमातून दररोज ३० ते ४० हजाराचा गल्ला मिळतो तर प्रत्येक बिंगो जुगारावर ४० ते ५० हजाराचा गल्ला मिळत असल्याने क्लब व बिंगो जुगार मोठ्या तेजीत आहेत. या दोन्ही जुगार धंद्यात युवक वर्ग मोठ्या प्रमाणात गुंतला गेल्याने अनेक युवक बरबाद झाले आहेत. यामुळे पाईपलाईन मार्गावरील परिसरातील सामाजिक स्वास्थ्य ही बिघडत चालेले आहे. याचा विपरीत परिणाम अनेक युवक क्लब आणि बिंगो जुगारामध्ये बरबाद झाल्याने व्यसनाधीन झाले आहेत. या भयवह परिस्थितीमध्ये स्थानिक पोलिसांना क्लब व बिंगो जुगार चालवणाऱ्यांकडून दर महिन्याला मोठा मलिदा मिळतो, यामुळे स्थानिक पोलिस पाईपलाईन मार्गावरील वाणीनगर कमानीजवळ क्लब व भाजीमार्केटजवळ असणारे चार व एकविरा चौकातील एक अशा एकूण पाच बिंगो जुगार अवैध धंद्यावर कारवाईकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. या पाईपलाईन मार्गावरील अवैधधंद्याबाबत अनेकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी गेले आहेत. परंतु स्थानिक पोलिसांना मोठा मलिदा मिळत असल्याने कारवाई होत नाही. या स्थानिक आशिर्वादामुळे पाईपलाईन मार्गावरील वाणीनगर कमानीजवळील क्लब व भाजीमार्केट जवळील व एकविरा चौकातील अशा पाच बिंगो जुगार चांगलेच तेजीत सुरु आहे.
कायमच वर्दळीच्या पाईपलाईन मार्गावरील वाणीनगर कमानीजवळील क्लब व भाजीमार्केटजवळ चार व एकवीरचौकातील एक अशा पाचही बिंगो जुगार धंद्यांवर ‘आयजी’च्या पथकाकडून कारवाई होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.