संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्यांना तोफखाना पोलीसांनी पकडले. विजय सुनिल बालल (वय १९, रा. सिंधी कॉलनी, तारकपुर), रोहन अरुण साळवे (वय १८ रा रामवाडी, ता. जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि मधुकर साळवे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध शाखेचे सपोनि नितीन रणदिवे, पो.उपनिरी समाधान सोळंके, पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, पोना. अविनाश वाकचौरे, संभाजी बडे, संदिप धामणे, सुरज वाबळे, वसिम पठाण, अहमद इनामदार, पो. कॉ. सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सतिष भवर, संदिप गिन्हे, गौतम सातपुते, सचिन जगताप, शफी सय्यद आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
दाखल गुन्ह्याच्या तपासात तोफखाना पोलीस ठाण्याच्या डिबी शाखेच्या पथकाने सिद्धेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यावरील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून आरोपी विजय सुनिल बालल व आणखी एक आरोपी निष्पन्न करुन आरोपीचा शोध सुरू केला. त्यातच दि.६ जून २०२३ रोजी माहिती मिळाली की, आरोपी विजय यालल हा रामवाडी परिसरात आलेला आहे. त्यावरुन तोफखाना गुन्हे शोध पथकाने तात्काळ जाऊन खात्री करता आरोपी विजय सुनिल बालल (वय १९, रा. सिंधी कॉलनी, तारकपुर), रोहन अरुण साळवे (वय १८ रा रामवाडी, ता. जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक केली. त्यानंतर आरोपी विजय सुनिल बालल याने तोफखाना पोलीस ठाणे हद्दीमधील सिद्धेश्वर मंदिर, डोकेनगर येथील साईबाबा मंदिर, सूर्या नगर येथील गणेश मंदिर, बालिकाश्रम येथील साईबाबा मंदिर, भिंगार येथील मानाचा गणपती मंदिर येथे दानपेटी फोडल्याची कबुली दिली. या घटनेबाबत गुन्हे आलेख तपासल्या असता, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
तोफखाना ठाणे: दारु पिण्यासाठी पैसे मागून मारहाण करणारा पकडला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : दारु पिण्यासाठी पैसे मागून मारहाण करून बळजबरीच्या चोरी करणारे चोरटे पकडण्यात तोफखाना पोलीसांना यश आले आहे.
मयुर सुनिल भिंगारदिवे (वय २५, रा. सावेडी नाका, परिचय हॉटेल मागे, सावेडी ता.जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि मधुकर साळवे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे नितीन रणदिवे, पो.उपनिरी समाधान सोळंके, पो.हे.कॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, पो.ना. अविनाश वाकचौरे, संभाजी बडे, संदिप धामणे, सुरज बाबळे, वसिम पठाण, अहमद इनामदार, पो.कॉ. सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सतिष भवर, संदिप गिन्हे, गौतम सातपुते, सचिन जगताप, शफी सय्यद आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी मयुर भिंगारदिवे हा फरार झालेला असल्याने त्याचा शोध चालू होता. दि.६ जुलै २०२३ रोजी आरोपी मयुर भिंगारदिवे हा सावेडी गावाजवळ चहाचे टपरीवर येणार असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शोध पथकाने सावेडी गावात सापळा लावून आरोपी मयुर सुनिल भिंगारदिवे (वय २५, रा. सावेडी नाका, परिचय हॉटेल मागे, सावेडी ता.जि. अहमदनगर) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.