तिसगावात वेश्याव्यवसाय करणाऱ्या
लॉजिंगवर छापा
अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच व पाथर्डी पोलिसांची संयुक्त कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : तालुक्यातील तिसगाव येथील
विशाल लॉजींग वेश्याव्यवसायावर पिटा कायदयान्वये अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच व पाथर्डी पोलीसांची संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.
एसपी राकेश ओला, अहिल्यानगर अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व शेवगाव डिवाय एसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार अतुल लोटके, संतोष खैरे, बाळासाहेब नागरगोजे, जालींदर माने व ज्योती शिंदे व पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोनि संतोष मुटकुळे व पोलीस अंमलदार नितीन दराडे, ईश्वर बेरड, ज्ञानेश्वर सानप, संदीप बडे, राजु सुद्रीक, अंजु सानप आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने पाथर्डी तालुक्यातील अवैध धंद्याची माहिती काढली. यानंतर अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीम व पाथर्डी पोलिस पोलिसांच्या संयुक्त टीमने दि.२० फेब्रुवारी २०२५ पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत तिसगाव येथील विशाल लॉजींग, (पाथर्डी ते अहिल्यानगर रोड) येथे छापा टाकला. या कारवाई पूर्वी विशाल लॉजिंग (तिसगाव) येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. यानंतर पोलिसांना लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याबाबत खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष विशाल लॉजवर छापा टाकून नारायण भाऊसाहेब माने, (वय ३७, रा.ढवळेवाडी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर) यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली. त्याचे ताब्यातून ४० हजार रु. किं. एक मोबाईल व २ हजार रु. रोख रक्कम असा एकूण ४२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. नारायण भाऊसाहेब माने याच्यासह लॉजची पाहणी करता लॉजच्या रूममध्ये एक महिला मिळून आली. महिलेकडे विचारपुस करता तिने नारायण भाऊसाहेब माने याने तिस वेश्या व्यवसायाकरीता आणल्याचे सांगून, ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधून तिला देऊन, तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशावर उपजीविका चालते,अशी माहिती सांगितली. पोलिसांनी महिलेची सुटका केली आहे.
अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने विशाल लॉजींग (तिसगाव, ता.पाथर्डी) येथे छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नारायण भाऊसाहेब माने (वय ३७, रा.ढवळेवाडी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर) हा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचच्या मपोकॉ ज्योती शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुरनं १४२/२०२५ स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत.