तारकेश्वर गडाचे मठाधिपती आदिनाथ शास्त्री यांना आयोध्याचे निमंत्रण

  1. प्रभू श्रीराम मंदिर हे जगातील रामभक्तांचे श्रद्धास्थान होणार -आदिनाथ शास्त्री
    संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
    Online Natwork
    पाथर्डी दि.२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व आपणा सर्वांचा सहयोगाने प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापनाचा अभुतपूर्व सोहळा अयोध्येत होणार आहे. या सोहळ्याकडे जगातील सर्व रामभक्तांचे लक्ष लागले आहे. प्रभू श्रीराम मंदिर हे जगातील रामभक्तांचे श्रद्धास्थान व गुरुस्थान होत आहे.या सोहळ्याच्या अलौकिक दिवशी देशात सर्वत्र दिवाळी साजरी केली जाणार आहे.साडेपाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.असे प्रतिपादन श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे मठाधिपती आदिनाथ शास्त्री यांनी केले आहे.
    पाथर्डी येथील श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे मठाधिपती आदिनाथ शास्त्री यांना अयोध्येचे प्रभु श्रीराम मंदिर तिर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने आमंत्रण पत्रिका विश्व हिंदू परिषदेचे विभागमंत्री सुनील खिस्ती यांनी दिली. याप्रसंगी कारसेवक अशोक चोरमले, जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे,शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!