संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- शासकीय पदाचा गैरवापर करून प्रायव्हेट प्लॉट वर बेकायदेशीर पने ताबा मारणाऱ्या ताबेखोर नायब तहसीलदार ठकसेन बाबुराव ढगे यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी शिवसेना युवासेना नगर उपशहरप्रमुख तथा मातोश्री फौडेशनचे अध्यक्ष दीपक कावळे पा. यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात श्री कावळे पा. यांनी म्हटले की, अहमदनगर मनपा हद्दीतील बालिकाश्रम रोड, वाघमळा परिसरात सि स नं – ७३९४/१ हा संपूर्ण सर्वे नंबर कै. सुरेश नामदेव वाघ यांच्या वडिलोपार्जित मालकीचा आहे, त्यातील १०० चौ मी (१गुंठा) मोकळी जागा नायब तहसिलदार ठकसेन बाबुराव ढगे यांनी त्यांच्या आईच्या म्हणजे भिमाबाई बाबुराव ढगे यांच्या नावे खरेदी केली आहे, परंतु नायब तहसिलदार हे त्या जागेत कायम वास्तव्यास आहेत त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून वाघ यांच्याच मालकीची त्याच्या शेजारीच असलेल्या जास्तीच्या २०० चौ फु (२ गुंठे) जागा बळकावुन ताबा मारला आहे, त्यात पक्के RCC बांधकाम व कंपाऊंड बांधले आहे.
त्या संदर्भात जागा मालक कै. वाघ यांचे नातु रजनीश अभिजित वाघ यांनी मनपाला रितसर तक्रार केली असुन मनपाच्या नगर रचना विभागाने त्यांचं बांधकाम अनधिकृत असल्याचे सिद्ध होऊन तसे पत्र व अतिक्रमण विभागाने स्थळ पंचनामा करून ३० दिवसांच्या आत अतिक्रमण व अनधिकृतपने मारलेला ताबा काढून घेणे संदर्भात ५२,५३,५४ ची नोटीस जा.क्र.- सी ०३७२ दिनांक २४/०३/२०२२ रोजी बजावली आहे त्याला देखील १ महिना उलटुन गेला आहे परंतु अद्याप पर्यंत त्यांनी अतिक्रमण काढलेले नाही. म्हणजे ताबेखोर नायब तहसिलदार ढगे यांनी अतिरिक्त जागा बळकावली व ताबा मारला आहे सिद्ध झालं आहे. अशा उच्च पदस्थ आणि शासनाच्या जबाबदार पदाधिकारी व अधिकाऱ्यांनीच जर गोर गरीब व सर्वसामान्यांच्या जमिनी बळकवायला सुरुवात केली तर आम्ही दाद मागायची कोणाकडे ? मी मोठा अधिकारी आहे माझं कोणीच काही वाकड करू शकत नाही व उलट जागा मालकांच्या घरच्यांवरच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी वारंवार दिली जात आहे व त्या पद्धतीने बळाचा वापर करून गुन्हे देखील दाखल केले आहेत .
अशा ताबेखोर नायब तहसिलदारमुळे आपल्या संपूर्ण विभागाची बदनामी होत आहे. त्यांच्यावर जमीन बळकावणे, अतिक्रमण ताबा मारणे, अनधिकृत बांधकाम करणे प्रकरणी तात्काळ निलंबनाची कडक कारवाई करन्यात यावी अन्यथा ह्या एका ताबेखोर अधिकाऱ्यामुळे आपल्या महसुल विभागाची “जनतेचे रक्षकच भक्षक झालेत” ही प्रतिमा होण्यास वेळ लागणार नाही. हा संपूर्ण प्रकार गांभिर्याने घेऊन ताबेखोर ढगे यांचे तात्काळ निलंबन करावे, अन्यथा पुढील ८ दिवसांनी आम्ही मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्या दरबारात कारवाई साठी प्रयत्नशील आहोत, कृपया याची नोंद घ्यावी, असे निवेदनात श्री कावळे पा. यांनी म्हटले आहे.