डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचे ॲड संतोष गायकवाड यांच्याकडून १३३ पुस्तकांचे वितरण
नगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील महोत्सव कार्यक्रमातील उपक्रम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती महोत्सवानिमित्ताने ॲड.संतोषभाऊ गायकवाड यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या “जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल” या विचारधारेनुसार जयंती दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावरील पुस्तक समाजकार्य करणाऱ्या १३३ व्यक्तींना १३३ पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे, कामगार संघटनेचे नेते अनंत लोखंडे, रावसाहेब काळे, प्रा. प्रमोद सुर्यवंशी, बाबा ढाकणे, मनोहर लांडगे, प्रा. शामुवेल वाघमारे, भाऊसाहेब ठोंबे, विजय भांबळ, हर्षल कांबळे, प्रसाद भिंगारदिवे आदी उपस्थित होते.