ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड शुक्रवारी होणार
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
संग्राम सत्तेचा
ठाणे : येथील ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद गेल्या १५ दिवसांपासून रिक्त आहे. अध्यक्ष पद अधीक काळ रिक्त ठेवणे योग्य नसल्याने कोकण विभागीय आयुक्तांनी या अध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी म्हणजे २८ मेरोजी घेण्याचे घोषीत केले आहे. त्यासाठी शिवसेनेतील ईच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तर काही सदस्य महिला नगर विकासमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांची भेट घेऊन आपले नशीब अजमावत आहेत.
या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा सुषमा लोणे, यांनी राजिनामा दिल्यानंतर सध्या अध्यक्ष पदाची प्रभारी जबाबदारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार पार पाडत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर आणि त्यात लागू केलेली संचार बंदीला विचारात घेऊन या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवड लांबणीवर जाण्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात होती. मात्र २८ मेरोजी या पदीची निवड घोषीत झाली आहे. त्यास अनुसरून शिवसेनेच्या गोटात सध्या खवबते सुरू झाले आहे. या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ अजून दीड वर्षे बाकी आहे. या दरम्यान कँबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेल्या या अध्यक्ष पदासाठी ईच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
या अध्यक्ष पदाची जबाबदारी लोणे यांनी दहा महिने सांभाळली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या पक्ष श्रेष्ठींकडून राजिनामा देण्याचे फर्मान येताच त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे राजिनामा दिला असता हे पद रिक्त झाले आहे. या अध्यक्ष पदाच्या दुसर्या टर्मसाठी ओबीसी महिला प्रवर्गा करीता अध्यक्ष पद आरक्षित आहे. त्यापैकी लोणे यांनी दहा महिन्यांचा कार्यकाल पुरा केलेला आहे. आता तब्बल या पदाचा दीड वर्षाचा कार्यकाल शिल्लक राहिलेला आहे. त्यासाठी पक्षनिष्ठ महिला सदस्याची चाचपणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या स्पर्धेत दोन ते तीन इच्छुकांचा समावेश असल्याचे सुतोवाच प्रभारी अध्यक्ष सुभाष पवार, यांनी केले आहे. मात्र नगरविकासमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच या अध्यक्ष पदाच्या उमेदवारीची घोषणा होईल. त्यामुळे या उमेदवाराविषयी कोणी ब्र ही काढायला तयार नाही.
जिल्हा परिषदेवर शिवसेनेसह राष्ट्रवादी, भाजपा आणि काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. सदस्य संख्येस अनुसरून या सर्व पक्षांना सत्तेत सहभाग दिलेला आहे. राज्य पातळीवरील सत्तेत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा, या विरोधी पक्षाला सुध्दा शिवसेनेने या जिल्हा परिषदेच्या सत्तेत गुरफटून ठेवले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकही विरोधी पक्ष नाही. जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्यांपैकी सर्वाधिक सदस्य असलेल्या शिवसेनेकडे प्रमुख अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसह बांधकाम सभापती आदी महत्त्वाचे पदे आहेत. उर्वरित सभापती पदं राष्ट्रवादी, भाजपा सदस्यांकडे आहेत. शिवसेनेच्या सर्व महिलांना अध्यक्षपदी संधी देण्याचे प्रारंभी च नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सहा सहा महिन्यांच्या कार्यकाळाची संधी दिली जात आहे. आतापर्यंत घ्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत शिवसेनेच्या तीन महिला अध्यक्ष पदावरुन पाय उतार झालेल्या आहेत. आता चौथ्या महिलेची या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी वर्णी लागणार आहे.
या आधी गेल्या साडेतीन वर्षांत शहापूर, भिवंडी आणि कल्याणला अध्यक्ष पदाचा लाभ मिळालेला आहे. तरी देखील शहापूर व भिवंडीच्या महिला सदस्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे,यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुरबाडला सध्या उपाध्यक्ष पद असल्यामुळे या तालुक्यांमध्ये अंबरनाथ तालुक्याला न्याय देण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार म्हणून अंबरनाथच्या चरगांव गटाचे नेतृत्व करणार्या पुष्पा बोर्हाडे पाटील, यांच्या नावाची जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा आहे.