ठाकरे खोटारडे आणि कपटी : नारायण राणे

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

Mumbai
मराठी माणूस, हिंदुत्व आणि शिवसैनिक यांची आठवण होत आहे. त्यांची चिंता वाटत आहेत. अडीच वर्ष सत्तेत असताना त्यांना शिवसेना, हिंदुत्व आणि मराठी माणूसही आठवला नाही. सत्ता गेल्यानंतर एक केविलवाणा प्रयत्न आणि व्यथा त्यांनी महाराष्ट्रासमोर मांडली आहे. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते व्याकूळ झाले आहेत. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही त्यांना कोणतही दुख: झालं नाही. उद्धव ठाकरेंना मी फार जवळून ओळखतो. शिवसेनेत मी ३९ वर्ष होतो.अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आणि दूष्टबुद्धी आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसून त्यांनी अडीच वर्षात ना जनतेचं, ना शिवसैनिकांचं आणि ना हिंदुत्वाची कामं केली नाहीत, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की,आजारपण आणि मातोश्री यामध्ये त्यांचं काम होतं. या मुलाखतीत मी आजारी होतो, माझं ऑपरेशन झालं, मी शुद्धीवर नव्हतो. त्याचवेळी गद्दारांनी सरकार पाडलं, असं ते म्हणत आहेत. जेव्हा जे शिवसैनिक होते. तेव्हा त्यांनी सत्ता आणली. जेव्हा उद्धव ठाकरेंचे विचार जुळले नाहीत. तसेच ते पक्षपात करायला लागले. त्यामुळे त्यांनी दुसरा गट तयार करून शिवसेनेच्या नावावर ते बाहेर पडले आणि सरकारमध्ये गेले.स्वत:चं पद एकनाथ शिंदेंना पोहोचून यातूनच संजय राऊतांना मुलाखत घ्यायला लावली, असं नारायण राणे म्हणाले.

संजय राऊत मनातून खूश आहेत

संजय राऊतांनी अजून एक काम हातात घेतलं आहे. पहिलं काम त्यांनी केलं. मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरंवायचं कामं त्यांनी केलं. आता त्यांच्या जखमेवर मीट चोळण्याचं काम सुरू आहे. संजय राऊत मनातून खूश आहेत. मी फत्ते झालो. शरद पवारांनी दिलेलं काम उत्तमरित्या झालं, याचं मला समाधान आहे, असा टोला राणेंनी राऊतांना लगावला आहे.

माझी माणसं विश्वासघातकी ठरली. तुम्ही कोणत्या शिवसैनिकांना विश्वास दिला. तुम्ही कोणत्या आमदार, खासदारांना आणि शिवसैनिकांना अडचणीत असताना मदत केली. तुम्ही त्यांना कधी भेट दिली आहे का, विश्वास दिला आहे का, तसेच त्यांना प्रेम दिलं आहे का?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

शिंदेंना मारण्याची सुपारी दिली होती

मी वाचलं की एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी दिली होती नक्षलवाद्यांना. हा काय पहिला प्रयोग नाही. साहेबांनी मोठे केलेली कर्तबगार माणसं शिवसेनेत उपजायला लागली, त्यावेळेला एकेकाला कमी करण्याचं काम यांनी केलं. रमेश मोरेची हत्या कुणी केली? जयेंद्र जाधवची हत्या कुणी केली? ठाण्याचा एक नगरसेवक, त्याची हत्या कुणी केली? नारायण राणेने शिवसेना सोडली, देशाबाहेरच्या गँगस्टरला सुपारी दिली. मी वाचलो तो माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे. तोंड उघडू नये, ज्यांना सुपाऱ्या दिल्या ते माझ्याशी बोलले की, आम्हाला असं असं काम मिळालं आहे. तुम्ही सावध राहा, नाहीतर दुसरं कुणी हे काम करेल, असा आरोप राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

महाराष्ट्र प्रशासनाच्या कोणत्या योजना राज्याच्या जनतेसाठी वापरल्या. सुखकर जीवन व्हावं सुखी व्हावेत. त्यासाठी कोणत्या प्रकारच्या योजना आणल्या. शेतकरी, कामगार, उद्योजन आणि इतर लोकांसाठी काय प्रगती केलीत. १३ कोटी जनतेच्या जीवनात काय प्रगती केलात. मी पर्वा मुख्यमंत्र्यांना अभिवादन करण्यासाठी मंत्रालयात गेलो. तिथे मला सर्व अधिकारी भेटले. अडीच वर्षात फक्त मुख्यमंत्री तीन तास मंत्रालयात आले होते. मुख्यमंत्री म्हणून पायउतार झाल्यानंतर कोणाच्याही डोळ्यांतून पाणी आलं नाही. त्यांना काहीही येत नाहीत. प्रत्येक कामं दुसऱ्याच्या हातातून करून घेतात. माझ्यासाठी मातोश्री नवीन नाही, अस नारायण राणे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!