संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई उनवणे यांची दि ११ एप्रिल २०२३ रोजी काँग्रेस भवन मुंबई येथे झालेल्या बैठकीत निराधार निराश्रित विभाग अहमदनगर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे हस्ते देण्यात आले यावेळी निराधार निराश्रितच्या प्रदेश अध्यक्षा राधिकताई मखांमले उपस्थित होत्या.

अहमदनगर जिल्ह्यात अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या व निराधाराचे प्रश्न कायम सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ज्योतिताई उनवणे यांची सामाजिक कामाची दखल घेऊन राधिका मखांमले यांनी त्यांच्यावर अहमदनगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली,यापुढे मी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व पक्षाचे ध्येय धोरण जनतेच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार असून तसेच निराधार निराश्रित महिला व पुरुषांसाठी सदैव काय करणार आहे. आणि त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देणार आहे असे ज्योतिताई उनवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या,त्यांच्या निवडीबद्दल जेष्ट नेते आ बाळासाहेब थोरात ,आ, लहुजी कानडे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून स्वागत केले जात आहे.