संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : आम्ही ‘पंच’ म्हणून अनेक ठिकाणी पोलिस कारवाईत असतो. मग आम्हाला काय भिती आम्ही काहीही धंदे केले, तरी आमच्यावर कारवाई सोडा, आमच्या धंद्यावर छापे पडणार नाही, या उर्मट घुमाराईत काही अपवाद ‘पंच’ म्हणून पोलिसांनी घेतलेले दिसत आहेत. पाहिले,तर या ‘रावसाहेब’चे बनावट दारु विक्रीचे धंदे, बिंगो, तसेच पत्ताचा क्लब पण, तोच पोलिसांच्या इतर कारवाईत ‘पंच’.. त्या ‘रावसाहेबा’च्या राजरोसपणे चालणा-या अवैध धंद्याकडे स्थानिक भिंगार पोलीस, नगर डिवायएसपी ऑफिस, नगर एलसीबी टिम’चे दुर्लक्ष! एसपी साहेब यात लक्ष द्या…
कारवाई दरम्यान पंच असणारी व्यक्तीही योग्य आहे का? याबाबत पोलीस अधिकारी अथवा पोलिस कर्मचारी कोणतीही शहानिशा न करत नाहीत. तो पंच होतो ना, मग पंच करा,या मानसिकतेत पोलिस प्रशासनातील अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कार्यवाहीत दिसत आहेत. ही बाब पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने घातक आहे. ज्याचे अवैध धंदे तोच ‘पंच’ हे कितपत योग्य आहे? याबाबत कुठलीही शहानिशा न करता पंच होतो ना मग करा, ही मानसिकता पोलिस प्रशासनात बदली पाहिजे, असे अनेक सूज्ञ नागरिकांनी मत मांडले आहे. ही बाब पोलिस प्रशासनाने म्हणजेच एसपी राकेश ओला, यांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
वास्तवात… भिंगार परिसरात असणाऱ्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये अनेक दिवसांपासून बनावट दारु विक्री होत असल्याच्या नागरिकांनी मिडियाकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच येथे बिंगो, पत्त्या सारखे जुगारही राजरोसपणे चालविले जातात. पण या धंद्यावर पोलिसांकडून कारवाई शून्य का?… याबाबत माहिती घेतली असता, तो अवैध धंद्यावाला पोलिसांचा पंच म्हणून काम करतो, ही भयवाह माहिती मिडिया समोर आली आहे. ही बाब पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने लाजरीवाणी आहे.. आता ‘एसपी साहेब’ या संबंधित ‘पंच’ च्या अवैध धंद्यांचा बंदोबस्त होईल का? पाहू या… अहमदनगर एसपी ओला साहेब कारवाई करता का…ते पाहू या !…