सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी येथील सतीश आजिनाथ बडे महाराज यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत विषयात शास्त्री परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. सतीश बडे महाराज यांचे प्राथमिक शिक्षण जोगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले आहे.तर यानंतरचे पुढील ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण हे श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ येथील शाळेत घेतले. उच्च माध्यमिक शिक्षण प्रतिनिधी हायस्कूल अँड जी.डी.बापू लाड कुंडल (ता. पलूस जि.सांगली) या ठिकाणी झाले. शास्त्री हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधीत पूर्ण करावा लागतो.
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी श्री बडे महाराज यांना प्रा.संस्कृती, विभाग प्रमुख अंबरीश खरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. बडे महाराज यांचे आध्यात्मिक शिक्षण स्वानंदसुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (आळंदी देवाची,पुणे) या ठिकाणी झाले आहे.
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कीर्तन व प्रवचन याचा ४ वर्षाचा अभ्यासक्रम देखील बडे महाराज यांनी ‘अ’ श्रेणीसह पूर्ण केला आहे. आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच शास्त्री या पदवीचे शिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संस्कृत विभागातून त्यांनी शास्त्री पदवीमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
त्यांनी मिळवलेल्या या यशाने सर्वच स्तरातून श्री बडे महाराज यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.