जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांचा छापा ; ९ जण ताब्यात, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : अवैध धंद्याविरोधात धडाकेबाज कारवायांमध्ये रविवारी जुगार अड्डयावर छापा टाकून १८ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई कोतवाली पोलीसांनी केली आहे.
एसपी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ ए पी इनामदार, पोहेकाॅ विशाल दळवी, मपोना संगिता बडे, पोकाॅ दिपक रोहोकले, पोकाॅ सुजय हिवाळे, पोकाॅ सत्यम शिंदे, पोकॉ तानाजी पवार, पोकाॅ सुरज कदम, पोकाॅ अनुप झाडबुके, पोकॉ अतुल काजळे, पोकाॅ सचिन लोळगे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी दि.४ ऑगस्ट २०२४ ला मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि प्रताप दाराडे यांनी गुन्हे शोध टिम’ला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध टिम’ने एका खाजगी मालवाहतूक पिकअप वाहनांमधून बसून कामगार असल्याचे भासवून त्या ठिकाणी जाऊन खात्री केली. या दरम्यान तेथे ठिकाणी ५.४५ वाजण्याच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकून त्या ठिकाणी तिरट जुगार खेळणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव भूषण बाबासाहेब बोरुडे (वय २८, रा. बोरुडे मळा अहमदनगर), प्रशांत गिरीष कसबे (वय ३४, रा. सारसनगर अहमदनगर), अनिल कारभारी साबळे (वय ४९, रा. बुरुडगाव जि.अहमदनगर), राजेंद्र पांडुरंग शिंदे (वय २५, रा. केडगाव देवी रोड एकता कॉलनी केडगाव, अहमदनगर) किरण पांडुरंग सिदोरे (वय ४०, रा. बोरुडेमळा जि अहमदनगर), विशाल शांतीलाल गांधी (वय ३८, रा. कायनेटीक चौक जि अहमदनगर), भाऊसाहेब रामभाऊ भोसले (वय ५५, रा. बुरुडगाव जि अहमदनगर), शेख सलमान बशिर (वय ३३, रा. विनायकनगर अहमदनगर), राधाकिसन पांडुरंग फुंदे (वय ३९, रा नारायणडोह ता जि अहमदनगर) असे सांगितल्यानंतर त्यांची पंचासमक्ष झडती घेतली. त्यांच्या कब्जातून एकूण १८ लाख ४२ हजार ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत जप्त करण्यात आला. या सर्वांना चौकशी कामी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोना संगिता बडे या करित आहेत.