👉सुंदर माझा दवाखाना उपक्रमाचे उद्घाटन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – जिल्हा रुग्णालय येथे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे घोष वाक्य “आरोग्य समानता, सर्वांसाठी आरोग्य” हे होते. जागतिक आरोग्य दिना निमित्त महाराष्ट्र शासनाने “ सुंदर माझा दवाखाना ” हा उपक्रम सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये दि.७ एप्रिल २०२३ ते १४ एप्रिल २०२३ रोजी राबविण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे आज “ सुंदर माझा दवाखाना” या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश रुग्णालयामधील व रुग्णालय सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे हा आहे. हा उपक्रम सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथेही याच कालवधी मध्ये राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना बारावकर भूलतज्ञ, अधिसेविका श्रीमती. सी. के जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्याकार्मासाठी श्रीमती. संगीता वैष्णव पी. एच. एन, नर्सिंग ट्युटर, बालरोगतज्ञ परिचारिका, परिसेविका, आधीपरिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, चतुर्थी श्रेणी कर्मचारी, नर्सिंग विद्यार्थी, LHV प्रशिक्षनार्थी उपस्थित होते. त्यांनी दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आणि रुग्णालय आणि परिसरात स्वच्छता राखण्यासाठी काम करण्याचे वचन दिले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती. सुरेखा आंधळे तर आभार प्रदर्शन श्रीमती. निलोफर शेख यांनी केले.