संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – सामाईक जागेमध्ये अतिक्रमण करून बांधलेल्या संडासच्या जागेवरून झालेल्या वादात एकास लोखंडी गजाने जबर मारहाणीत मयत झाल्याची घटना रविवारी (दि.२६) दुपारी घडली. या घटनेत मयत झालेल्याचे नाव पोपट लक्ष्मण घोरपडे (वय५०, रा शिराळ, ता पाथर्डी) आहे. या घटनाप्रकरणी पाचजणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, चुलत भाऊ मयत पोपट लक्ष्मण घोरपडे यास सामायिक जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या संडासचे जागेवरून लोखंडी गजाने ज्ञानदेव गणपतराव घोरपडे, दत्तात्रेय ज्ञानदेव घोरपडे, हनुमंत ज्ञानदेव घोरपडे, अंजू घोरपडे (पूर्ण नाव माहिती नाही), रोहिणी घोरपडे (पूर्ण नाव माहित नाही. सर्व रा. शिराळ ता. पाथर्डी जि. अहमदनगर) यांनी जबर मारहाण करून यांनी जीवे ठार मारले, या प्रतापराव रामराव घोरपडे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात पोस्टे गुरनं – ०२२२/२०२३ भा.द.वि. कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी हनुमंत ज्ञानदेव घोरपडे, रोहिणी हनुमंत घोरपडे या दोघांना अटक करण्यात आले आहे.
एसपी राकेश ओला, डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस ठाण्याचे पो.नि.चव्हाण यांच्या सूचनेनुसार सपोनि पाटील, सपोनि कायंदे, पोसई लिमकर आदिंसह पोलिस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.