जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रक्षेपण पाहत असतील तर मुंबईत गेल्यावर आमची चंपी : खा.संजय राऊत

👉राज्यात एकही ऑक्सिजन अभावी मृत्यू नाही
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

सोनई : येथील भाषणात खा.संजय राऊत यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता, तसेच अनेकांनी मास्क लावले नसल्याचे दिसून आले. नेमकी हीच परिस्थिती ओळखून स्वतः खा.राऊत यांनी म्हटले, जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहत असतील तर मुंबईत गेल्यावर आमची चंपी होईल, असे ते म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई या ठिकाणी शनिवारी (दि.३१) उपस्थित राहण्याचे औचित्य होते, ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन हे शिवसेना खा. संजय राऊत यांच्या हस्ते होते. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित गर्दी पाहून खा.राऊत हे आपल्या भाषणात म्हटले.
या कार्यक्रमास राज्याचे जलसंधारणमंत्री तथा नेवासा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना लोकप्रतिनिधी शंकरराव गडाख, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, अहमदनगरच्या शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान पञकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री राऊत म्हणाले की, शिवसेनेने अनेक नेते व कार्यकर्ते घडवले. त्यातील काहीजण पक्ष सोडून इतर अनेक पक्षात गेले, पण आजही त्यांची ओळख हा शिवसेनेत होता, अशीच आहे. शिवसेना सोडली आणि कितीही पक्ष बदलले तरी त्या नेत्यांची ओळख ही शिवसेना आहे.
यावेळी बोलताना खा.राऊत यांनी देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांचे बळी गेले हे सांगताना केंद्र सरकार ही आकडेवारी लपवत असल्याचा आरोप केला. मात्र हे सांगत असताना महाराष्ट्र राज्यात ऑक्सिज अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे कोरोना काळात राज्य सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!