दिंडी सोहळ्यात अहमदनगर, बीड जिल्ह्यातील वारकरी सहभागी
सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : अहमदनगर व बीड या दोन्ही जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या तिर्थक्षेत्र गहिनीनाथ गडाचे श्री संत वामनभाऊ महाराजांच्या दिंडीचे रविवारी (दि.१८जून) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भाऊ’ची दिंडी पाऊल चालती पंढरीची वारी, अशा अभंग म्हणत मोठ्या उत्साहाने हरिनामाचा गजरात मार्गस्थ झाली. या श्री भाऊ’च्या दिंडी सोहळ्यात भव्य असा रथाबरोबर अहमदनगर, बीड जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
