👉आदिवासी समाज बांधवांना जात प्रमाणपत्राचे केले वितरण
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : नागरिकांना भेटणे, त्यांच्या अडचणी, समस्या समजावून घेऊन ती कामे मार्गी लावण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जा, नगरविकास, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. यावेळी अनेक वर्षापासून जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी समाजातील १६ जणांना त्यांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे मागील आठवड्यात राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी मागील आठवड्यात भेट दिली होती. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यांनी पुन्हा कापुरवाडी येथे या नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी गुरुवारी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह येऊन अडचणींचे निराकरण केले.
कापूरवाडीतील सुमारे ४५ कुटुंबे ही आदिवासी जमातीची आहेत. त्यांना अनेक वर्ष प्रयत्न करून जात प्रमाणपत्र मिळत नसल्या कारणाने त्यांना बऱ्याच लाभापासून वंचित राहावे लागत होते. त्यांनी ही बाब राज्यमंत्री श्री. तनपुरे यांना सांगितली होती. आज त्यांच्या हस्ते ४५ पैकी १६ लोकांना जात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उर्वरित जात प्रमाणपत्र बाबत तातडीने पूर्तता करून येत्या दोन दिवसात समंधिताना देण्याचे निर्देश त्यांनी दिले.. अदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विविध योजनांचा लाभ आता घेता येणार आहे.
याशिवाय, या वेळी, संजय गांधी निराधार योजनांच्या निकषात बसणाऱ्या महिलांचे अर्ज त्वरीत अधिकाऱ्यांमार्फत भरून घेतले. वैयक्तिक योजनांचा लाभाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहीचाव्यात यासाठी अधिकारी वर्गाने स्वतःहून पुढाकार घेऊन लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली
कापुरवाडी गावातील पाझर तलावाच्या दुरुस्तीबाबतचा विषय मार्गी लावण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री यांचेकडे पाठपुरावा करून सोडवणार असल्याचे राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मंत्रिपदाची संधी मिळाली. या पदाच्या माध्यमातून जनहिताची कार्ये व्हावीत असाच माझा प्रामाणिक प्रयत्न आणि प्राथमिक उद्देश आहे. त्यासाठीच आपण कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
👉राज्यमंत्री तनपुरे यांची आपुलकी आणि सामाजिक भान
गावातील अदिवासी दिव्यांग व्यक्तीस जात प्रमाणपत्र राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन दिले व समस्या जाणुन घेतल्या. यावेळी संदेश कार्ले, शरद झोडगे. गोविंद मोकाटे, रघुनाथ झिने, उद्धवराव दुसुंगे, परसराम भगत, राजेंद्र भगत, अँड .अभिषेक भगत, अमोल जाधव, सरपंच संभाजी भगत, ग्रामपंचायत सदस्य , सर्व अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.