👉 शिवप्रेमींचे मोर्चाने शेवगाव पोलिसांना निवेदन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर बदनामी कारक मजकूर प्रसारित केल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि.१२) शिवप्रेमींनी मोर्चा काढण्यात येऊन शेवगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले. सोमवारी (दि१३) शेवगाव शहरात बंद पाळण्यात येणार आहे. शेवगावमधील शिवप्रेमी युवकांनी शेवगाव पोलीसांना दिलेल्या निवेदनात आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.
राजेंच्या बद्दल सोशल मीडियावर बदनामी कारक मजकूर प्रसारित केल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सामाजिक वातावरण दूषित करण्यासाठी काही समाजकंटक प्रयत्न करत आहेत. त्यांचा तातडीने बंदोबस्त व्हावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि.१३) शेवगाव शहरात बंद पाळण्यात येणार आहे. बाजार पेठेतील व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे, असे आव्हानही शिवप्रेमींनी यावेळी केले आहे.
संकलन : निलेश ढाकणे, शेवगाव