पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामसेवकांचे आर्थिक सक्षमिकरण – सभापती सुनिल गडाख
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – ग्रामसेवक हा प्रशासानातील सर्वात महत्वाचा घटक आहे. गाव पातळीवर ग्रामसेवकांच्या मदतीनेच गावांचा विकास होत असतो. गावाच्या विकासात ग्रामसेवकांचे मोठे योगदान राहिले आहे. अशा ग्रामसेवकांची उन्नत्ती व्हावी, त्याचे आर्थिक सक्षमिकरण व्हावे, यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध उपक्रम कौतुकास्पद असेच आहे. पतसंस्थेने आपल्या सभासदांचे हिताचे जे निर्णय घेतले आहेत, त्यामुळे भविष्यात ही पतसंस्थाच्या माध्यमातून मोठे कार्य उभे राहील, यात शंका नाही. पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ सभासदांच्या हितासाठी कार्य करावे, त्यास आपले सहकार्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांनी केले.
छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेस जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत पतसंस्थेचे चेअरमन सुदाम बनसोडे यांनी केले. यावेळी नेवासा पं.स.उपसभापती किशोर जोजार, अनिल भणगे, भाऊसाहेब भांड, भगवान भांड, मानद सचिव संतोष खंडागळे, संतोष साबळे, संतोष नेरलेकर, भारत खाटीक, व्यवस्थापक राजेंद्र शेडाळे, सचिव पवनकुमार घिगे, सुरेश निनावे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी चेअरमन सुदाम बनसोडे म्हणाले, पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांची उन्नत्ती साधली आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या लौकिकात भरच पडत आहे. पतसंस्थेने स्वमालिकीच्या जागेवर बांधकाम सुरु केले असून, बहुपयोगी इमारत लवकरच उभी राहिल. यासाठी अनेकांचे सहकार्य लाभत आहे. सभापती सुनिल गडाख यांनी जि.प.च्या माध्यमातून चांगली कामे केली आहे. सर्वांगिण विकासासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. पतसंस्थेच्या कार्यात त्याचे सहकार्य कायम राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत यांनी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या कामाकाजाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खंडागळे यांनी केले तर आभार भगवान भांड यांनी मानले.