चोरलेले बाक-या,बोकड चोरणारे, विकत घेणारे आरोपी अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई




संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – बकऱ्या, बोकड चोरणारे व ते विकत घेणा-यांना आरोपींना अटक करून स्थानिक गुन्हे शाखेने पकडून सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
 नितीन जयशिंग काळे (वय- ३५, रा. जावळे मळा, पोखडी शिवार, ता. नगर), दान्या फाजल्या चव्हाण (वय ५० रा. जावळेमळा, पोखर्डी शिवार, ता. नगर),  संजय दान्या चव्हाण (वय२२) व  एक विधीसंघषित बालक यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.  शकील शेख व महमंद शेख ( दोघे रा. झेंडीगेट), शकील बाबू शेख (वय ५४, रा. इदगाह मैदान, झेंडीगेट, नगर),  महमंद हनिफ शेख नजीर (वय ३५, रा. नगर) अशी पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

दि.१ रोजीचे रात्री फिर्यादी राजेन्द्र आसाराम माटे (वय ३२, रा. पोखर्डी, ता. नगर) हे त्यांच्या बकऱ्या व बोकड घरासमोर बांधून झोपले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचा ६ हजार रु. किं. चा बोकड चोरुन नेला, या राजेंद्र आसाराम माटे (वय ३२, रा. पोखर्डी, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर  स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना श्री कटके यांना गुप्त खब-याकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा नितीन काळे (रा. पोखर्डी शिवार) याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सफीमन्सूर सय्यद, सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ संदीप घोडके, पोना,शंकर चौधरी, पोकों शिवाजी ढाकणे, रविद्र घुंगासे, रोहीदास नवगीरे, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे, अशांनी मिळून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेऊन आरोपी  नितीन जयशिंग काळे (वय३५, रा. जावळे मळा, पोखडी शिवार, ता. नगर) यांस प्रथम ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार दान्या चव्हाण, संजय चव्हाण व एक अल्पवयीन साथीदार अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यावरुन आरोपींचा शोध घेऊन वरील आरोपी नितीन जयशिंग काळे, दान्या फाजल्या चव्हाण, संजय दान्या चव्हाण व विधीसंघर्षित बालक यांना विश्वासात घेऊन आणखी कोठे-कोठे बक-या चोरी केलेल्या आहेत. याबाबत कसून चौकशी केली असता, त्यांनी तोफखाना, एमआयडीसी व नगर तालुका हद्दीतून बक-यांची चोरी केली असल्याची माहिती सांगितली. त्यावरून तोफखाना, नगर तालुका व एमआयडीसी पो.स्टे. चे वर नमुद गुन्ह्यासह एकूण ७ गुन्हयामध्ये आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे.
सर्व आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं. T९४ / २०२१ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे भादवि कलम , एमआयडीसी पो.स्टे. गुरनं. १६० / २०२१ भादवि कलम, एमआयडीसी पो.स्टे.
 तोफखाना पो.स्टे. गुरनं. ३७१/२०२१ भादवि ३७९ प्रमाणे, नगर तालुका पो.स्टे. गुरनं. ३०/ २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे,नगर तालुका पो.स्टे. गुरनं. १२९ / २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!