चिंचपूर पांगुळ शिवारात देवगिरी डोंगराला आग, वनसंपदा जळून खाक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : तालुक्यातील चिंचपूर पांगुळ शिवारात देवगिरी डोंगराला आग लागून शेकडो एकरवरील वनसंपदा जळून खाक झाल्याची घटना घडली. तालुक्यातील चिंचपुर पांगुळ गावाच्या उत्तर बाजूला देवगिरी डोंगर असलेल्या क्षेत्राला रविवारी (दि.१६) संध्याकाळी ६ च्या सुारास अचानक आग लागली होती. या आगीत जनावरांचा चारा तसेच हजारो पक्षी,त्याची घरटी ,सरपटणारे प्राणी,कीटक मृत्युमुखी पडले असल्याचा अंदाज आहे.दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, डोंगर शिवार हा निर्मनुष्य असून तिथे टवाळखोरांनी ही आग लावली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शेकडो झाडा-झुडपाचे नुकसान
या आगीची झळ , कडूनिंब, जंगली बाभळी ,दभोंड,आणि इतर शेकडो झाडांना बसली. त्यातील . मोठ्या झाडांना थोडीच झळ बसल्याने ती वाचण्याची शक्यता आहे. इतर झाडे मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली