सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांची ४७ वी पुण्यतिथी तारखेप्रमाणे मंगळवारी दि.२४ जानेवारी रोजी रामगड संस्थान तसेच श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ या ठिकाणी महंत विठ्ठल महाराज यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. विठल महाराज यांच्या हस्ते श्री संत वामनभाऊच्या प्रतिमेस फुलांचाहार घालून विधिवत पूजन करण्यात आले. विठ्ठल महाराज यांचे स्वागत मुख्याद्यापक नरोडे सर यांनी केले.
यावेळी विठ्ठल महाराजांनी आपल्या प्रवचनातून विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान रामगड या ठिकाणी इंदूवाशिनीदेवी पिंपळनेर संस्थानचे मठाधिपती त्रिविक्रम शाश्री महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले.
त्रिविक्रमशास्त्री महाराज यांनी वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांचे आध्यत्मिक जिवन कार्यावर आधारित मार्गदर्शन करीत त्यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्श असल्याचे सांगत सर्वांनी त्यांचे मार्गदर्शक कार्याचे अनुकरण करत जीवनात मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले.
दुपारी पुष्पवृष्टी करून संत वामनभाऊ यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी महाप्रसाद घेतला. दरम्यान काल रात्री भजनी मंडळाच्या वतीने,हरिजागर करण्यात आला. या प्रसंगी पंचक्रोषीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.