सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी: – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी (ता.पाथर्डी) येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. दररोज सकाळी काकडा,भजन,गाथा-भजन,रामकथा,दररोज रात्री कीर्तन, जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सोमवारी (दि.३ एप्रिल)रोजी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
त्यानंतर दुपारी १२वाजता संत वामनभाऊ यांच्या चरण पादुकावर पुस्पवृष्टी करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असल्याचे महंत विठ्ठल महाराज यांनी सांगितले आहे.
दरम्यान आज गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन ,तसेच भगव्या पताका घेऊन पुरुष लहान मुले सहभागी झाले होते.
गावातून बँड, टाळ,मृदुगाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती.
सप्ताहाच्या कार्यक्रमात अनेक साधू संत ,राजकीय नेते यांनी भेट दिली. खासदार सुजय विखे पा., आमदार मोनिकाताई राजळे, करुणा मुंढे आदिंनी भेटी दिल्या. सोमवारी (दि.३) कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चिंचपूर पांगुळ-मानेवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत वामनभाऊ महाराज अखंड हरिनाम सप्ताह कमिटीने केले आहे.