सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी मार्गे येताना रस्त्यातील चिंचपूर पांगुळ अरुंद घाट रस्ता शेतमाल वाहतुकीसाठी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी अडचण नसून खोळंबा’ अश्या बातम्या ‘नगर रिपोर्टर’ ऑनलाईन न्यूज नेटवर्क ने वेळोवेळी प्रसिद्ध केल्या. या वृत्तांची दखल घेऊन आमदार मोनिकाताई राजळे यांनी पाठपुरावा केला, यात विशेषतः प्रशासनानेही या समस्याकडे लक्ष केंद्रीत केले असून, आता या चिंचपूर पांगुळ अरुंद घाट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रशासनाने रस्त्याचे काम सुरू केले आहे. यामुळे चिंचपूर पांगुळ घाट रस्त्याने येणारी रहदारी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
रहदारी या मार्गाने 👉
पांढरवाडीफाटा येणारी रहदारी ही पांढरवाडीफाटा-चिंचपूर पांगुळ – वडगाव- पिंपळनेर-पाथर्डी तर पाथर्डीकडून येणारी रहदारी याच मार्गाने वळविण्यात आली आहे. चिंचपूर पांगुळ घाट रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत याच मार्गाचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन पाथर्डी सा.बां.विभागाने केले आहे.