
सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ (ता.पाथर्डी ) येथील ग्रामदैवत मलिक (मलकेश्वर) महाराजांच्या यात्रोत्सवाची सांगता शनिवारी (दि.२५) रोजी कुस्त्याचा हंगामाच्या कार्यक्रमाने झाली. यात्रा महोत्सवसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.


श्री.क्षेत्र पैठण व नागतळा येथून पायी कावडधाऱ्यांनी आणलेल्या पाण्याने गुरुवारी सायंकाळी मलिक देवास जलाभिषेक घालण्यात आला. तरुणांनी यावर्षी येथे प्रथमच तमाशा, ऑर्केस्ट्रा, कार्यक्रमास फाटा देऊन हरीकीर्तन ठेवले होते. शुक्रवारी रात्री राष्ट्रीय किर्तनकार सुनिताताई अभिमंन्यू आंधळे महाराज यांच्या जाहीर हरिकीर्तन झाले. शनिवारी सकाळी लोककलावंतांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम झाला . दुपारी कुस्त्यांचा जगीं हगामा भरवण्यात आला होता. या कुस्त्यासाठी नामवंत मल्लानी हजेरी लावली होती. यावर्षी प्रथमच भव्य दिव्य असे कुस्त्यांचे सामने खेळवले गेले.

यासाठी हरियाना राज्यातूनही खेळाडूं उपस्थित झाले होते. बीड , उस्मानाबाद, पुणे, बारामती, सोलापूर जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हगाम्यांत हजेरी लावली. कुस्ती समालोचन निवेदक दिनेश गवळी यांनी केले. यावेळी महिला पहिलवान देखील सहभागी झाले होत्या.
यात्रा कमिटीच्या वतीने विजयी मल्लांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र केसरी विजेते सईद चाऊस, पाथर्डी पचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड, बाजार समितीचे सभापती गहिनीनाथ शिरसाट, श्री आंधळे महाराज, अनिल गुंजाळ, बाळू आवारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आकाश मलिक, नितीन मलिक, सुमित कुमार या हरियाणाच्या मल्लांनी उपस्थिती लावली.
गावातील तसेच परिसरातील मुबंई, पुणे तसेच इतर ठिकाणी असलेले चाकरमानी आवर्जून यात्रेसाठी उपस्थित होते. चिचपुर पांगुळ येथे दरवर्षी चैत्र महिन्यात गुडीपाडव्यानंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवार ते शनिवार या दरम्यान यात्रा भरते. यावेळी कुस्ती शौकीन, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.