संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील जवाहर विद्यालयातील शिक्षक व विदयार्थी यांनी जलशक्ती अभियानांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
कॕच द रेन २०२२ या संकल्पनेअंतर्गत जनतेत जलजागृती व्हावी यासाठी हे अभियान राबवले जात आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांद्वारे जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक खेडकर, युवा नेते विजय मिसाळ, बाळासाहेब नागरगोजे, मा.सरपंच ज्ञानेश्वर खेडकर, सेवा सोसायटीचे संचालक आजिनाथ डोळे, मा.केंद्रप्रमुख अंबादास खेडकर, बाबासाहेब खेडकरसर, सुनिल खेडकरसर, अंबादास घोडके, अभिमन्यू खेडकर, वामन लोखंडे, रामराव खेडकर, आजिनाथ खेडकर, विष्णू खेडकर, विष्णू सोनवणे, भागवत खेडकर, अंकुश वाघमारे, शिवाजी खेडकर आदींनी प्रभातफेरीचे स्वागत केले. मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर, शिक्षक वृंद निलेश फुंदे, धनंजय घायाळ, विशाल उदमले, भैय्या गायकवाड, रविंद्र खेडकर, धनश्री शिरसाट ,सुरेखा माळवे, सविता बडे, सुभाष डोळे, सुभाष जायभाये, उद्धव लोखंडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होतेे.
संकलन-पत्रकार सोमराज बडे९३७२२९५७५७