वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी मंगळवारी (दि.२५) रात्री उशीरापर्यंत जितेंद्र भावेंवर गुन्हा दाखल करण्याची हॉस्पिटल प्रशासनाने तयारी केली असताना प्रत्यक्षात मात्र, गुन्हा दाखल न करण्याची भूमिका घेतली. अर्थात पोलिसांनी शांतता भंग करणे, घोषणाबाजी केल्याप्रकरणी भावेंसह समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रुग्णांचे नातेवाईक अमोल जाधव व जितेंद्र भावे यांच्या चौकशीदरम्यान भावे यांचे समर्थनार्थ दिनानाथ चौधरी, शुभम खैरनार, अक्षरा घोडके, राम वाघ, सोमनाथ कुराडे, प्रिया विद्याधर कोठावदे, शशीकांत शालीग्राम चौधरी, भाग्यश्री हेमंत गहाळे, रवींद्र धनक , योगेश कापसे, संजय रॉय,विनायक येवले. संदीप शिरसाठ, सागर प्रफुल्ल कुलकर्णी आदींसह 20 ते 25 जणांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले. समर्थकांनी पोलिसांच्या कायदेशिर कारवाईस अटकाव करून मंगळवारी (दि.२५) सायंकाळी 5 ते रात्रौ १०.30 वाजेपर्यंत बेकायदेशिरपणे विनापरवानगी मुंबई नाका पोलीस ठाण्यात येवून गैरकायद्याची मंडळी जमवून घोषणाबाजी, सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच वोक्हार्ड हॉस्पिटलविरूध्द तक्रार असल्यास लेखी तक्रार न देता समर्थकांनी घोषणाबाजी केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी समर्थकांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून, घोषणाबाजी, सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्यात 143, 145, 149, 188, 269, 270, 504सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 2005 चे कलम 51 अन्वये गुन्हा दाखल केला आला आहे. वोक्हार्ड हॉस्पिटल येथे कपडे काढुन आंदोलन करणारे अमोल जाधव व जितेंद्र भावे यांना समजपत्र देण्यात आली. दोघांवर कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे कलम 51 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110, 112,117 प्रमाणे पोलीस एनसी दाखल करण्यात आली आहे. तसेच भावे यांनी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी जवळच्या पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी, अशी समज देण्यात आली आहे.