ग्रामीण भागातील यशांजली भाजीपाला उत्पादक शेतकरी महिला बचत गटाच्या वतीने डिजिटल ऑनलाइन भाजीपाला विक्रीला सुरुवात.
👉 अहमदनगर व पुणे शहरांमध्ये भाजीपाला ऑनलाईन विक्री ॲप चे उद्घाटन आ.निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न. ऑनलाईन न्यूज नेटवर्क
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
अहमदनगर – कर्जत येथील ग्रामीण भागातील यशांजली भाजीपाला उत्पादक शेतकरी महिला बचत गटाच्या वतीने डिजिटल ऑनलाइन भाजीपाला विक्री ॲप चे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गौरी होगले, मोनिका बरबडे, नीता गोंजारे, छाया नेटके, राहुल (मुन्ना) वैद्य, गणेश भालसिंग, सुरेश गोंजारे, शिवाजी नेटके, रेवन होगले, केतन खिची, मनीष तेवर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की ग्रामीण भागातील महिलां हे किती प्रगतीपथावर आहे याचे उदाहरण म्हणजे यशांजली भाजीपाला उत्पादक शेतकरी महिला गट च्या माध्यमातून दिसत आहे आत्ताची परिस्थिती बघता ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील माल खरेदी करून शहरात विक्री करण्याचा हा जो निर्णय घेतला आहे हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आहे शहरी भागातील नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळणार आहे व याची प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील महिला ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग करण्यास पुढे येणार असल्याची भावना लंके यांनी व्यक्त केली यावेळी महिला बचत गटाच्या गौरी होगले म्हणाल्या की गेल्या वर्षभरापासून कोरोणाच्या जागतिक संकटामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झाला आहे त्यामुळे बाजार समित्या बंद झालेल्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिके शेतातच खराब झाली त्यामुळे आमच्या सारख्या गरीब व लहान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे भाजीपाला फळे ही तर दररोज लागणारी गरज आहे याशिवाय लोक जगू शकत नाहीत म्हणून शासनाने भाजीपाला व फळे याची घरपोच सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे आमच्या शेतातील उत्कृष्ट व दर्जेदार शेतमाल हा योग्य व कमीत कमी किमतीत उपभोक्त्या पर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आम्ही गावातील महिलांनी एकत्र येऊन नगर व पुणे शहरात घरपोच भाजीपाला व फळे देण्याची योजना तयार केली आमच्या गावातील महिला एकत्र येऊन यशांजली भाजीपाला उत्पादक शेतकरी गट या शेतकरी गटामार्फत आपल्या शेतातील चांगल्या उत्कृष्ट दर्जाच्या भाजीपाला व फळे नगर शहरातील व पुणे शहरातील उपभोक्त्या पर्यंत पोहोचवण्यासाठी भाजीबाजार मोबाईल ॲप तयार करण्यात आले या ॲप वरून भाजी घरपोच मागवता येणार व bhazibazaar.com या ॲप डाऊनलोड करण्यासाठी किंवा आमच्या कस्टमर केअर नंबर 9579095303 वर मिस कॉल केला तरी लिंक भेटणार असण्याची माहिती गौरी होगले याणी दिली.