संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- राज्यामध्ये बंदी असलेल्या गोमांसची विक्री करणा-या तिघांना भिंगार कॅम्प पोलीसांनी पकडले.
सलीम उर्फ बबा बुढण कुरेशी (वय ६३ रा.घर नं ३७, सदरबाजार, भिंगार ता. जि. अहमदनगर), नावेद सादीक कुरेशी (वय ३८ रा.घर नं १९१९,हमालवाडा,व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट ता. जि. अहमदनगर), गुफरान शब्बीर कुरेशी (वय ३२ रा.हमालवाडा, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट ता.जि.अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोहेकाँ व्हीआर गारूडकर, पोहेकॉ एएन नगरे, पोना आरआर द्वारके, पोना आरटी गोरे, पोना भानुदास खेडकर, पोना सचिन धोंडे, चापोकाॅ एसआर शेख, पोना आरएन कुलांगे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१५ नोव्हेंबरला भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली की, आलमगीर परिसरात असीम किराणा स्टोअरसमोर, आलमगीर, असीम किराणा दुकान शेजारी आलमगीर, मिलिंद कॉलनी, तांबोळी यांच्या घरासमोर, अलमगीर (ता. जि. अहमदनगर) येथे पत्र्याचे शेडमध्ये दुकानामध्ये काहीजण हे राज्यामध्ये गोवंशी जनावराचे कत्तल करण्याची मनाई असतांना ही गोवंशी जातीचे जिवंत जनावरांची कत्तल करुन गोमांसाची दुकानामध्ये विक्री करत आहेत, आता गेल्यास मिळून येतील अशी माहिती मिळाल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने आलमगीर परीसरात असीम किराणा स्टोअर समोर, आलमगीर, असीम किराणा दुकान शेजारी आलमगीर, मिलिंद कॉलनी, तांबोळी यांचे घरासमोर, अलमगीर ता. जि. अहमदनगर येथे छापा टाकून कारवाई केली. या कारवाई २९ हजार रु. किं चे अंदाजे १४५ किलो गोमांस मिळून आले. वजन काटे, वजन मापे, गोमांस कापण्यासाठी लागणारे साहीत्य असा एकूण २९ हजार रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पकडण्यात आलेल्यांवर पोना सचिन धोंडे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गु.नं ५५४/२०२२ भादवि.क २६९, ३४ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (सुधारणा) सन २०१५ चे कलम ५ (क), ९(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई पोहेकाँ पी ए बारगजे हे करीत आहेत.