गॅस टाकीने पेट घेतल्याने दोन कुटुंबाची संसार उपयोगी साहित्य भस्मसात ; टाकळीमानूराची घटना
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : ऐन दिवाळीत तालुक्यातील टाकळीमानूर येथे घरात स्वयंपाक चालू असताना गॅस टाकीने पेट घेतल्याने दोन कुटुंबाची संसार उपयोगी साहित्य भस्मसात झाले असून, सुमारे 15 क्विंटल कापूस, कपडे, दागिने रोख रक्कम भस्मसात झाल्याची माहिती मिळाली आहे. आग विझवण्यास गेलेला एक युवका जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की टाकळीमानूर येथे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अर्जुन विश्वनाथ कारंडे यांच्या घरी स्वयंपाक चालू असताना अचानक गॅस टाकीने पेट घेतल्याने कुटुंब घराबाहेर आले. कुटूंबातील व्यक्ती बाहेर आल्यानंतर गॅस टाकीचा मोठा स्फोट झाला घरामधील अर्जुन कारंडे यांची पत्नी, सून घराबाहेर आले दोन्ही कारंडे कुटुंबीयांनी प्रसंग सावधान राखल्याने मोठा अनर्थ टाळला घरातील सुमारे 15 किलो कापूस, धान्य, संसार उपयोगी साहित्य कपडे, दागिने जळून खाक झाले आहे. शेजारी असणाऱ्या फर्निचर दुकानदार संजय जोशी यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन व नगरपालिकेशी संपर्क साधून अग्निशामक बंब बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र अग्निशामक सुमारे अर्ध्या तासाने आला तोपर्यंत जेसीबीच्या साह्याने भिंत पाडण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही आग विझवण्यासाठी गेलेल्या रघुनाथ लक्ष्मण ठोंबरे आग विझवत असताना एका गॅस टाकीचा स्फोट झाल्याने अंगावर अग्नीच्या ठिणग्या पडल्याने जखमी झाला आहे.त्यास उपचारासाठी पाथर्डी येथे दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी नगर परिषदेचा अग्निशामक आल्याने आग आटोक्यात आणण्यात आली परंतु तोपर्यंत दोन्ही कुटूंबाचे सर्व साहित्य भस्मसात झाले होते.
शेजारी असणारे भाडेकरू किरकोळ जखमी झाली असून त्यांची पत्नी व दोन लहान मुले स्फोट होण्यापूर्वीच घराबाहेर गेल्याने मोठा अनर्थ टाळला सुमारे एक तास हि आग विझवण्याचा गावातील लोक प्रयत्न करत होते मात्र घरातील गॅस टाक्या असल्याने स्फोट होण्याची भीती होती. शेजारी अनेक दुकाने व अनेक कुटुंब घरी राहत असल्याने भीतीयुक्त वातावरण तयार झाले होते. गॅस टाकीचा झालेला आवाज सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत घुमला होता.ऐन दिवाळीच्या सणामध्येच दोन्ही कुटुंबातील संसार उपयुक्त साहित्य व घर भस्मासात झाल्याने परिसररामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.