गुटखा दिला नाही, या कारणातून नगर तालुक्यात खून
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : गुटखा दिला नाही, या कारणावरुन शिवीगाळ करत एकाचा लाकडी काठीने डोक्यात मारुन नगर तालुक्यातील अरणगांव शिवारात खून केल्याची घटना घडली. अयज रामरुम चौधरी असे मयताचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील अरणगांव शिवारात शैलेंद्र सुरेश यादव (वय ३२, रा. जमुरिया खुर्द, ता.मेधावल, जि. संतकबीरनगर, उत्तरप्रदेश ह. रा. जी.एच.व्ही. कंपनी, अरणगांव, अहमदनगर) हा अरणगांव शिवार, अहमदनगर येथे उभा असताना यातील मयत अयज रामरुम चौधरी ( वय २२, रा. मटीयार, ता. भुतहवा, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश ह.रा. अरणगांव शिवार,ता.जि.अहमदनगर) व आरोपी तेजनारायण अर्जुन तांते (वय २४, रा. मथायदिरा, ता.खगाडिया, राज्य बिहार ह.रा. जी. एच.व्ही. कंपनी, अरणगांव, अहमदनगर) याच्यामध्ये भांडणे सुरु होती. तेव्हा शैलेंद्र सुरेश यादव व साक्षीदार हे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता मयत अयज रामरुम चौधरी हा म्हणाला की, मी तेजपाल यास गुटखा दिला नाही, या कारणावरुन शिवीगाळ करत आहे, असे सांगत असतानाच आरोपी तेजनारायण अर्जुन तांते याने तेथे पडलेल्या लाकडी काठीने अयज रामरुम चौधरी यांच्या डोक्यात मारुन गुरुवारी (दि.१२ ऑक्टोबर २०२३) ला रात्री ९ वा. खून केला आहे., या घटनेच्या शैलेंद्र सुरेश यादव यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुरन : ७७९/२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई युवराज चव्हाण, पोसई रंजित मारग हे तपास करीत आहेत.