संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून एका आरोपीविरुध्द कारवाई करुन ६९ हजार रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने यात १ हजार २०० लिटर कच्चे रसायन व ९० लिटर तयार दारु नष्ट करण्याची मोठी कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार पोहेकॉ तानाजी हिंगडे, संदीप पवार, संदीप घोडके, पोकॉ मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, विनोद मासाळकर व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली.
एसपी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांनी एलसीबी टिम’ नेमून अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये कारवाई करुन एका ठिकाणी छापे टाकला. या छाप्यात ६९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे १ हजार २०० लि. कच्चे रसायन, ९० लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त व नष्ट करण्यात आला. या कारवाईत गोरख बाबा जपकर (वय ३०, रा. रानमळा, नेप्ती, अहमदनगर) याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.