संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी: नगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने भक्तगण असणारे वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७व्या पुण्यतिथी सोहळ्याचा कार्यक्रम उद्या रविवारी (दि.१५) रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने वामनभाऊच्या समाधीवर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिरावर विद्दुत रोषणाई करण्यात आली आहे. या उत्साहासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यानिमित्ताने रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजीमंत्री पंकजा मुंडे, बीडच्या खासदार प्रितम मुंडे, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, माजीमंत्री आ.सुरेश धस, माजी आमदार भीमसेन धोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
परंपरेप्रमाणे वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री. क्षेत्र गहिनीनाथगड (ता.पाटोदा) येथील पारंपरिक महापूजा सकाळी होणार असून त्यानंतर महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन सेवा होईल.त्यानंतर समाधीवर दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावेळी लाखोंचा भक्त परिवार राज्यभरातून उपस्थित राहाणार आहे.
दरम्यान आज पासूनच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या ठिकाणी पुण्यतिथी सोहळ्यास उपस्तीत रहाणार असल्याने गहिनीनाथ गडावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
✍संकलन-पत्रकार सोमराज बडे