👉बीड खासदार प्रितम मुंडे, मंञी धनंजय मुंडे व प्रथमच आमदार रोहित पवार उपस्थितीत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- नगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीवर असणा-या श्री संत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम मंगळवार (दि.२५) मोठया उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाप्रसंगी बीड खासदार प्रितम मुंडे व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात गहिनाथगडाच्या व परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. दरम्यान गडावर प्रथमच हजेरी लावलेले आमदार रोहित पवार यांचा विठ्ठल महाराजांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सर्व दिग्गजांच्या उपस्थितीत वेबसाईट चे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान दरवर्षी प्रमाणे वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री. क्षेत्र गहिनीनाथगड (ता.पाटोदा) येथील पारंपरिक महापूजा बीडचे पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने महापूजा व महाआरती करण्यात आली.
महापूजेत मंञी धनंजय मुंडे यांनी देश लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावा, अशी प्रार्थना केली.
यावेळी महंत विठ्ठल महाराज म्हणाले की, आई वडिलांना जपा त्यांना म्हतारपणी वाऱ्यावर सोडू नका.व्यसनापासून दुर रहावे, हीच शिकवण वामनभाऊ नेहमी देत होते त्याचे पालन तरुणांनी करावे. कोरोनाचे सावट दूर करण्यासाठी सर्वांनी नाका तोंडाला हात लावण्यापूर्वी साबनने धुवून घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितीत भक्तांना केले.
यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भिमराव धोंडे, मा. जि.प.सदस्य शिवाजीराव नाकाडे याच्यांसह बीड व अहमदनगर या जिल्ह्यातून भाविक उपस्थित होते.
संकलन-पत्रकार सोमराज बडे