गटतट विसरून विकासगंगा आणण्यासाठी साथ द्या : शिवाजीराव कर्डिले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच नगर तालुक्यातील माझ्या जनतेच्य पाठबळावर झाली. तीस वर्षांपासून तालुक्यातील सर्वस्तरातील जनता माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे. मी कधीही जातपात धर्म न पाहता गावागावांत विकासकामे केली. मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. पण ज्यांना मामाच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले, सहा खाते मिळाले त्यांना विकासाचे प्रश्न मार्गी लावता आले नाही. मी आमदार नसतानाही राज्यातील भाजप महायुतीचे सरकार, पालकमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावली. त्याचे श्रेय घेवून नारळ फोडण्याचे काम विद्यमाना लोकप्रतिनिधीनी चालवले आहे. ही धूळफेक जनतेला कळून चुकली आहे. गटतट विसरून विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

माजीमंत्री कर्डिले यांनी अहिल्यानगर तालुक्यातील दरेवाडी, वडारवाडी, केकती, बाराबाभळी आदी गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच त्यांनी नेप्ती कांदा मार्केट मधील हमाल, मापाडी, व्यापारी शेतकर्‍यांची संवाद साधत भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माजी नगरसेवक निखिल वारे, अनिल करंडे, कानिफनाथ कासार, विजय खोमणे, ज्ञानदेव काळे, रामपाल मळकर, लक्ष्मण तागड, संजय धोत्रे, अंबादास बेरड, सोनू भुजबळ, बद्रीनाथ बेरड, रामदास आंधळे, गोविंद सांगळे, बापू लाटे, अनिल म्हेत्रे, रावसाहेब वागस्कर, प्रकाश घोरपडे, सुभाष गुंजाळ, माणिक वागस्कर, बाळासाहेब तागडकर आदी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती दलित वस्ती निधी अंतर्गत होणार्‍या कामाचे श्रेय घेण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधीने चालवले आहे. – त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून गावांना विविध खात्याअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात पूर्ण अपयश आले. नेप्ती उपबाजार समितीतील कांदा मार्केट देशात अग्रेसर आहे. याठिकाणी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात येतात. कारण माझी शेतकर्‍यांशी बांधलकी आहे. महायुती सरकारने शेतकर्‍यांना वीज बिल पूर्ण माफ केले आहे. शेतकरी सन्मान योजनेतून शेतकर्‍यांना वर्षाला 12 हजार रुपये भेटतात. त्यामुळे शेतकर्‍यांचा खरा साथदार महायुतीच आहे. नेप्ती उपबाजार समितीमध्ये दोनशे व्यापारी आपल्या कांद्याचा व्यवसाय करत असून 2 हजार हमाल मापाडी रोजगार मिळवतात. दरम्यान नेप्ती उपबाजार समितीत झालेल्या बैठकीत हमाल, मापाडी, व्यापार्‍यांनी एकमुखाने माजी मंत्री कर्डिले व आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.
राहुरी तालुक्यातून शिवाजीराव कर्डिलेेंना मोठा पाठिंबा मिळत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!