संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी लेखी तक्रारद्वारे मागणी करत जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शनी भागात लावण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयामध्ये रुग्णांच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावलेली निदर्शनास येत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जून २०१९ मध्ये सर्व राज्यांमध्ये रुग्ण हक्काची सनद खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात लावण्याचे आदेश जारी केले होते. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने सप्टेंबर २०२० आणि मे २०२१ मध्ये या विषयी आदेश निर्गमित केले आहेत. कोरोना काळातील खाजगी रुग्णालयांमधील गैरप्रकार व रुग्णांचे झालेले शोषण आदीची दखल सरकारणे घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हयाना आदेश दिले होते. रुग्ण हक्काच्या सनद मध्ये रुग्नाला प्राप्त असलेले अधिकार, आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क, तपासण्यांचे तपशील, उपचारांचे परिणाम, अपेक्षित खर्च, तपासण्यांचे अहवाल व सविस्तर बिले मिळण्याचा हक्क या सारखे अनेक रुग्ण हक्काचा सनदमध्ये समावेश आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात १५ दिवसाच्याआत रुग्ण हक्कांची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती तात्काळ दर्शणी भागात लावण्यात यावी व त्या बाबतचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश निर्गमित करावेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यात यावा.
दाखल केलेल्या या तक्रारीवर शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीत अंतिम कार्यवाही करुण तक्रार निकाली काढावी अशा आशयाचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.