संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
जामखेड : तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव ते खर्डा या रस्त्याची गेल्या आनेक वर्षापासून दैना फीटेना. विशेष म्हणजे धनेगाव येथील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विठ्ठल मंदिराला क वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. होऊन गेलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने देखील या रस्त्यावरून आनेक दिंड्या व वारकर्यांनी प्रवास केला या वेळी त्यांना या खराब रस्त्याचा वाईट आनुभव आल्याने संताप व्यक्त केला आहे.
धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव या ठिकाणी आषाढी व कार्तिकी एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आसतात प्रत्येक एकादशीच्या दिवशी या मंदिरात कीर्तन होते. आषाढी एकादशी निमित्ताने देखील जामखेड तालुक्यासह या ठिकाणी भुम, परांडा, करमाळा या ठिकाणाहून देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने वहानांनी येत आसतात मात्र हा खर्डा ते धाकटी पंढरी धनेगाव हा संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील पडलेल्या मोठमोठ्या खड्यांनमुळे सारखे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
जामखेड मतदारसंघात आ. प्रा राम शिंदे व आ. रोहित पवार आसे दिग्गज नेते आमदार म्हणून लाभले आहेत तरी देखील या तिर्थक्षेत्राकडील जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था गेल्या दोन तीन वर्षांनपासुन फीटेना धनेगाव येथिल माजी सरपंच सुधिर काळे यांनी देखील या रस्त्याला नीधी मिळावा यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला आहे. मात्र अद्याप रस्ता झाला नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर धनेगाव येथिल माजी सरपंच सुधिर काळे, सरपंच महेश काळे, उपसरपंच अन्सारभाई शेख, चेअरमन तुराभाई शेख, माजी चेअरमन उत्तम रसाळ, शिवाजी भोळे, रघुनाथ उंबरे, ईश्वर चव्हाण यांनी लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
संकलन : नासीर पठाण, जामखेड
.