संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – मोमोज् हे खाद्य व नेपाळ व तिबेट वासियांच्या फूड संस्कृतीचा एक भाग असून, आता आपल्याकडेही या चविष्ठ खाद्याने चोखंदळ खवय्यांच्या जिभेवर अधिराज्य गाजवले असून, या सर्वांच्या अग्रहास्तव कोहिनूर मॉलमध्ये मोमोज् मॅजिक कॅफेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. श्रीजी इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक प्रतिथयश उद्योजक दिनेशजी आग्रवाल व सौ.सुनिता आग्रवाल यांच्या हस्ते फित कापून या कॅफेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संचालिका सौ.अनिषा आग्रवाल, सागर आग्रवाल, इंजि.सुदीप आग्रवाल, स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संचालिका सौ.अनिषा आग्रवाल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, बिहार येथील उद्योजिका सौ. गरिमा सिंग व धनंजय सिंग यांची मोमो मॅजिक कॅफेची फॅ्रच्यायसी आम्ही घेतलेली असून, संपूर्ण भारतात यांचे 136 पेक्षा जास्त खाद्य दालने आहेत. एकूण 36 प्रकारचे चविष्ट व रुचकर असे मोमोज् आमच्या या कॅफेमध्ये उपलब्ध केले असून, हे संपूर्णत: शाकाहारी आहेत. याच बरोबरच चायनिज् पदार्थ देखील येथे आपणास मिळणार आहे. तेही संपुर्णत: शाकाहारी आहेत.

खास लहान मुलांसाठी चॉकलेट मोेमोज् आम्ही या दालनात उपलब्ध केले आहेत. या खाद्य दालनाचे वैशिष्ट म्हणजे, संपूर्णत: हायजिनिक किचन बनविलेले असून, जैन मोमोज् देखील या दालनामध्ये प्रथमच उपलब्ध करुन दिले आहे. मोमोज् हे गहू-आटा व मैदा यापासून बनविला जातो. यामध्ये विशिष्ट मसाल्यांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे याबरोबर विविध खाद्य वनस्पतीपासून बनविलेले सॉसेस देखील ग्राहकांना दिले जातात. कोहिनूर मॉलमधील तिसर्या मजल्यावर खास ग्राहकांच्या अग्रहास्तव या खाद्य दालनाचा शुभारंभ केला असून, आवश्य आपण सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी मोठ्या संख्येने आग्रवाल परिवाराचे स्नेही उपस्थित होते.
संकलन : प्रेस फोटोग्राफर अनिल शाह